Karnatka New CM Siddaramaiah : पुन्हा एकदा कर्नाटक मुख्यमंत्री पदी सिद्धरामय्याच

Karnatka New CM Siddaramaiah:सिद्धरामय्या ह्यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी वर्णी
➤ Karnatka New CM Siddaramaiah:कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी बाजी मारली. हायकमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. डी. के. शिवकुमार (Shivakumar) यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे असतील. दोन्ही नेत्यांनी सत्ता परिवर्तनासाठी कंबर कसली आणि बदल घडवून आणला. मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चुरस होती. पण हायकांमडचा निर्णय दोघांनीही मान्य करण्याचे ठरवले होते. खलबतानंतर सिद्धरामय्या यांच्या नाव पुढे आले. पण याबाबतीत शिवकुमार सर्वांच्याच पुढे आहेत. दूर दूरपर्यंत या रेसमध्ये त्यांच्यासमोर कोणीच नाही.
Karnatka New CM Siddaramaiah ह्यांची संपूर्ण माहिती
कर्नाटक राज्यातील नवीन मुख्यमंत्री सिद्धारामैया (Siddaramaiah) आहेत. सिद्धारामैया विश्वनाथन आराव (Vishwanathana Aarav) हे आपले खासगी नाव आहे. त्यांनी 2018 साली कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाच्या विरोधात साधारण विजय ग्राहीत केली. सिद्धारामैया विभागीय नेतृत्व करून कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली आहे.त्यांनी कर्नाटक राज्याच्या विकासाच्या क्षेत्रात विशेष लक्ष देऊन आर्थिक, सामाजिक, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात प्रगतीसाठी प्रयत्न केले आहे. सिद्धारामैया यांचे व्यापक अनुभव आणि कार्यक्षमता त्यांच्या प्रशासनिक कौशल्याचा साक्षी आहे.
Karnatka New CM Siddaramaiah:सिधारामाय्या ह्यांची कर्नाटक विधानसभा २०२३ निवडणुकीतील कामगिरी
सिद्धरामय्या यांनी वरुणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यांना 60.9 टक्के मतदान झाले. तर डीके शिवकुमार यांनी कनकपुरा विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावले. त्यांनी 75 टक्के मतदान खेचून आणले. सीएम पदी जरी सिद्धरामय्या यांनी बाजी मारली असली तरी संपत्तीच्या बाबतीत डीके शिवकुमारच खरे धनी आहेत. ते गडगंज श्रीमंत आहेत.
Karnatka New CM Siddaramaiah:राजकीय पार्श्वभूमी
१९८० च्या दशकात लोहियावादाने प्रभावित होऊन सिद्धरामय्यांनी राजकारणात उडी घेतली. १९८३ मध्ये भारतीय लोकदलाच्या तिकिटावर त्यांनी जुन्या म्हैसूर विभागातील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघातून पहिला विजय मिळवला. तत्कालीन जनता दलात सामील होऊन रामकृष्ण हेगडेंच्या मंत्रिमंडळात ते मंत्री झाले. १९९४ मध्ये एच. डी. देवेगौडांच्या सरकारमध्येही ते मंत्री होते. जनता दलात फूट पडल्यानंतर सिद्धरामय्या देवेगौडांसोबत राहिले व जनता दल (ध)चे प्रदेशाध्यक्ष बनले. २००४ मध्ये काँग्रेस व जनता दलाच्या संयुक्त सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले. देवेगौडांशी मतभेद झाल्यानंतर सिद्धरामय्यांनी २००५ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते आत्तापर्यंत ९ वेळा विधानसभेवर निवडून आले असून २०१३ मध्ये त्यांच्या गळ्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची माळ पडली. सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवणारे सिद्धरामय्या दुसरे नेते होते. त्याआधी देवराज अर्स यांनी पाच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण केला होता.
Karnatka New CM Siddaramaiah:सिधारामाय्या ह्यांची संपूर्ण संपती
➤सिद्धरामय्या यांच्याकडे एकूण 51 कोटींची मालमत्ता आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यांची पत्नी पार्वती यांच्या नावावर 21 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर 9 कोटी रुपये सिद्धरामय्या यांच्या नावे तर पत्नीच्या नावे 11 कोटी रुपये आहेत. दोघांच्या नावे 30 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. सिद्धरामय्या यांच्या नावे 9 कोटींची अचल संपत्ती तर पत्नी पार्वतीच्या नावे 20 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. सिद्धरामय्या यांच्या डोई जवळपास 23 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
Karnatka New CM Siddaramaiahसिधारामाय्या ह्यांचा शपथविधी सोहळा कधी असेल ?
20 मे रोजी कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी चे सर्वच नेते ह्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
FAQ:Karnatka New CM Siddaramaiah : पुन्हा एकदा कर्नाटक मुख्यमंत्री पदी सिद्धरामय्याच
Read All MPSC blogs
➤ BSE odisha 10th result live Updates live links
➤ Karnatka New CM Siddaramaiah : पुन्हा एकदा कर्नाटक मुख्यमंत्री पदी सिद्धरामय्याच
➤ MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
➤ MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
➤ MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
Read More MPSC Blogs
MPSC Books pdf