तर मग जुनीच कर पद्धत राबवा-उद्धव ठाकरे|dompsc

➤ दि. १ जुलै २०१७ पासून भारताने वस्तू व सेवा कर नावाची नवीन व आधुनिक अशी कर पद्धती लागू केली असून संपूर्ण जगात या निर्णयामुळे भारतीय सरकार चे कौतुक झालेलं दिसते आहे. केंद्रातील bjp सरकारने या पद्धतीचा पाठपुरावा करून आहे त्या परिस्थितीत जुन्या कर पद्धती ला नामशेष करून gst नावाची कर पद्धती अवलंबली असली तरी या पद्धती मध्ये अनेक त्रुटी असल्याचे सतत जाणवते आहे .
➤ नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी असे वक्तव्य केले की जर विकेंद्रीकरनाचा फायदा त्या त्या राज्याला न होता केंद्रीकरनामुळे आर्थिक गोष्टींसाठी राज्याला केंद्रावर जर अवलंबून राहावं लागतं असेल तर , या नवीन पद्धती चा उपयोग काय असे वक्तव्य उध्दव ठाकरे यांनी केले आहे. नवीन कर पद्धती नुसार संपूर्ण राज्यातील जमा झालेला कर हा राज्यशासनाने वसूल करत केंद्राला सुपूर्त करणे बंधनकारक असते.
➤ सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशातील कर एकत्र करत केंद्र सरकार जमा झालेल्या कराची व राज्याच्या खर्चाची प्रमाणबध्द अशी सूत्रे बांधून त्या संबंधित राज्याला सुपूर्त करीत असते. पण सध्या स्थिती मध्ये महाराष्ट्र राज्याला केंद्राकडून काही विशिष्ट कर परतावा येणं अपेक्षित होत .यावर राज्याचे अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडे अनेकदा मागणी केली पण राज्याने स्वतः मध्यवर्ती बँक कडून कर्ज घ्यावे असा सल्ला त्यांनी दिला. यासर्व घडामोडी मधून राज्याला स्वतःचा खर्च भागवणे वेळोवेळी कठीण जात आहे आणि केंद्रसरकार त्यांचा अधिकाराचा गैरभाजपा राज्यात दुरुपयोग करत आहे असे प्रतिपादन काही राज्यातील लोक करताना भासत आहेत.
➤ या सर्व घटनेचा संदर्भ घेत शेवटी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी असे वक्तव्य केलेलं आहे की , जर का केंद्राला परतावा देणे कठीण जात असेल आणि वस्तू व सेवा करतील त्रुटी दुरुस्त करने शक्य भासत नसेल तर मग जुनीच कर पद्धती केंद्राने स्वीकारावी.
Tags: Mpsc Environment 2020 Mpsc Physics 2020 Mpsc Physics 2020 Mpsc Chemistry 2020 Mpsc All Subject Mpsc All Books Mpsc Current Affairs 2020