https://www.dompsc.comविकासदर मात्र उनेच|dompsc

विकासदर मात्र उनेच

➤ भारतीय अर्थव्यवस्था सुधारत असल्याचा केंद्राचा दावा असला तरी सध्य स्तिती तील आकडे वारी मात्र वेगळेच संकेत देताना दिसत आहे . सरकारने केलेल्या सर्वे्षणानुसार दुसऱ्या तिमाहीत सुद्धा अर्थव्यवस्थेचा विकास दर मात्र कमीच आल्याचा दिसत आहे.

➤भारतीय अर्थव्यवस्था ही जगात ५ व्या क्रमांकावर असून मार्च २०२० अखेरीस पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही सतत विकासाच्या पायऱ्या पार करत असल्याचे चित्र लोकांच्या नजरेत भासत होते. अनेक अर्थ तज्ञांच्या मते हा एका प्रकारचा आर्थिक फुगवटा असून लवकर फुटणार असे प्रतिपादन करत असताना कोरोना च्या वाईट परिस्थिती मुळे भारतीय अर्थव्यस्थेतील अधोगती सुरू झाल्याचं दिसण्यात आलेलं आहे .

➤ एप्रिल ते जून या तिमाही मध्ये आर्थिक विकास दर उने -२३% निदर्शनात आला असून चालू वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर दरम्यान सकल उत्पन्न दर -७.५ निदर्शनात आलेला भासत आहे. मागील काही दिवसात ताळे बंधी शिथिल झाल्यामुळे मागील तिमाही पेक्षा या तिमाही मध्ये विकासदर जरासा वाढलेला आढळल्याने विकास झाला असे भासत असले तरी तो सध्या उणे स्थितीतच आहे.➤ मागील तिमाही मध्ये बाकी क्षेत्र संपूर्ण कोलमडून पडलेलं असताना ही निर्मिती क्षेत्र आणि कृषी क्षेत्रात उलाढाल उत्तम प्रमानात होती. मात्र दुसऱ्या तिमाही मध्ये कृषी आणि निर्मिती क्षेत्रात उलाढाल झाली असून सेवा क्षेत्र मात्र अजून कोलमडल्या स्थिती मधेच आहे.

विकासदर कसा मोजतात ?


➤ सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य दर्शविण्यासाठी जगभर वापरले जाणारे एकल मानक निर्देशक आहे.विशिष्ट कालावधीत देशाच्या सीमांमध्ये उत्पादित सर्व तयार वस्तू आणि सेवांचे आर्थिक मूल्य दर्शविणारी एक एकच संख्या आहे.सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय सांख्यिकी कार्यालय व्यापक आर्थिक डेटा गोळा करणे आणि सांख्यिकीय रेकॉर्ड ठेवण्यास जबाबदार आहे. या प्रक्रियेत उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण करणे आणि इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन (आयआयपी) आणि ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) सारख्या विविध निर्देशांकांचे संकलन करणे समाविष्ट आहे. जीडीपी आणि इतर आकडेवारीची गणना करण्यासाठी आवश्यक डेटा संकलित आणि संकलित करण्यासाठी केंद्रीय सांख्यिकी कार्यालय विविध संघराज्य आणि राज्य सरकारी संस्था आणि विभागांसह समन्वय साधते. उदाहरणार्थ, उत्पादन, पिकाचे उत्पादन किंवा वस्तू - जे घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) आणि सीपीआय मोजणीसाठी वापरले जातात या संदर्भातील डेटा पॉईंट्स ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागात किंमत मॉनिटरिंग सेलद्वारे एकत्रित आणि कॅलिब्रेट केले जातात.तर अश्या प्रकारे भारतात विकासदर मोजला जातो.


Tags: Mpsc Environment 2020 Mpsc Physics 2020 Mpsc Physics 2020 Mpsc Chemistry 2020 Mpsc All Subject Mpsc All Books Mpsc Current Affairs 2020