https://www.dompsc.com

प्रयोग व प्रयोगाचे प्रकार (change the voice )-मराठी व्याकरण

प्रयोग व प्रयोगाचे प्रकार


प्रयोग व प्रयोगाचे प्रकार

✪ ❝ कर्ता ,कर्म ,क्रियापद यांच्या परस्पर सम्बंधाला ❞प्रयोग असे म्हणतात
● कर्त्या ची व् कर्माची क्रियापदाशी जी ठेवण असते त्याला प्रयोग असे म्हणतात .

✪ मराठी व्याकरनामध्ये प्रयोगाचे प्रमुख तिन प्रकार आहेत

  1. कर्तरी प्रयोग
  2. कर्मणि प्रयोग
  3. भावे प्रयोग

✪ प्रयोगाचे प्रकार


कर्तरी प्रयोग

वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग,वचनानुसार बदलते त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

● ❝कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी प्रथमा विभक्ति मध्ये असतो.

➊ सकर्मक कर्तरी:ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात..
● उदा.शुभम आंबा खातो

➋ अकर्मक कर्तरी:ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
● उदा.शुभम पडला.

कर्मणि प्रयोग

वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग,वचनानुसार बदलते त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

➊ प्रधान कर्तुककर्मणि प्रयोग:क्रियापद हे कर्माच्या लिंग ,वचनानुसार बदलत असले तरी ,बहुतेक कर्ताच प्रधान असतो
● उदा.तिने गाणे म्हंटले.

➊ शाक्य कर्मणि प्रयोग:ज्या वाकयातुन क्रियापद शक्यता दाखवतो त्याला शाक्य कर्मणी प्रयोग म्हणतात.
● उदा.रामाच्याने काम करवते.

➊ प्राचीन पुरुष कर्मणि प्रयोग:प्राचीन काव्यत सकर्मक धातुला ज हा प्रत्यय लावून करिजे ,बोलिजे असे शब्द बनतात त्याला प्राचीन पुरुष कर्मणि प्रयोग म्हणतात.
● उदा.नले इंद्रासी बोलिजे.

➊ समापन कर्मणि प्रयोग:जेव्हा प्रयोगाच्या वाक्याचा क्रियाप्दाचा अर्थ क्रिया पूर्ण झाल्या सारखा वाटतो तेव्हा त्याला समापन कर्मणि प्रयोग म्हणतात.
● उदा.त्याचा पेरू खाऊन झाला.

➊ नवीन कर्मणी प्रयोग / कर्मकर्तरी:इंग्रजी तील passive Voice प्रमाने कर्म आधी लिहिल्या जाते.
● उदा.रामाकडून रावन मारल्या गेला.

भावे प्रयोग

क्रियापदाचे रूप हे कर्त्या व् कर्मा च्या नुसार बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुष नापुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा त्याला भावे प्रयोग असे म्हणतात.
● उदा.मुलाने बैलास मारले.

● ❝कर्ता नेहमी तृतीय किंवा चतुर्थी असतो.
● ❝कर्म नेहमी द्वितीया असते.

➊सकर्मक भावे:वाक्यात कर्म असते.
● उदा.मुलानी चेंडू खेलावे.

➊ अकर्मक भावे:वाक्यात कर्म नसते.
● उदा.मुलानी खेलावे.

✪ काही वाक्यात एकाच वेळेस २ वेगळी प्रयोग येतात तेव्हा त्याना मिश्र किंवा संकर प्रयोग म्हणतात.


➊कर्तु कर्म संकर
● उदा.तू मला पुस्तक दिलेस.
(कर्तरी-कर्मणि )

➊कर्म -भाव संकर
● उदा.आईने मुलाना शाळेत घातले.
(कर्मणि-भावे )

➊क्रतु भाव संकर
● उदा.तू घरी जायचे होतेस.
(कर्ता-भावे प्रयोग )


Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar

Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers

Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List

MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )






Download MPSC Books pdf


Connect With Us


Subscribe Us For Updates


Submit Your Email ID And Download Current Affairs 2023 Question Bank , Free! Free! Free!

->