https://www.dompsc.com


ASO Mains syllabus

ASO Mains syllabus

Author

By Shubham Vyawahare

-3-December-2024
➤ MPSC आयोगा मार्फत घेतल्या जाणार्या MPSC ASO परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर विदर्त्यानी मिळवलेल्या गुणांनुसार ते STI Mains , PSI Mains ,ASO Mains ला पात्र होत असतात,किंवा काही विद्यार्थी वरील सगळ्याच परीक्षेत पास होण्याचे गुण पात्र करत असतात.परंतु ASO Mains परीक्षा हि पूर्व पेक्षा वेगळी असून त्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी ASO Mains Syllabus चा पूर्ण अभ्यास असणे गरजेच असते.
➤ ASO Mains चा अभ्यासक्रम २०२० मध्ये अद्यावत करण्यात आला असून त्यातील सर्व मुद्दे इथे नमूद केले आहेत. परीक्षा हि आता ४०० गुणांची झाली असून प्रश्नसंख्या मात्र २०० च आहे.

ASO Mains Syllabus 2021 PDf



➤ आयोगाने दिलेल्या Syllabus वर आधारित ASO Mains Syllabus पुढीलप्रमाणे

ASO Mains Syllabus- Paper 1(मराठी,इंग्रजी,सामान्यज्ञान )


Subject Topics
English Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Meaning and Usage of Phrases and idioms, comprehension of passage
मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्य रचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
सामान्य ज्ञान
घडामोडी जागतिक तसेच भारतातील
कायदा माहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015
संगणक व माहिती तंत्रज्ञान आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेट्वर्किंग आणि वेब टेक्नोलोजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळविण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडिया ल्याब एशिया, विद्या वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

ASO Mains Syllabus-Paper 2


Subject Topics
इतिहास सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळ, राष्ट्रीय चळवळी.
भूगोल महाराष्ट्राचा रचनात्मक (physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (physiographic) विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे. मानवी व सामाजिक भूगोल : लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतरण व त्याचे मूळ (सोर्स) आणि इष्ट स्थळ (डेस्टिनेशन) वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.
राज्यशास्त्र घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमाघील भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे,ठळक वैशिष्ट्ये , केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्त्यव्य ,राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण,युनिफोर्म सिविल कोड,स्वतंत्र न्यायपालिका.
नियोजन प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मुल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देह्स फलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, 73 वी आणि 74वी घटना दुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हान, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.
राजकीय यंत्रणा राजकीय यंत्रणा(शासनाची रचना अधिकार व कार्य),केंद्र सरकार,केंद्रीय विधीमंडळ आणि राज्य सरकार व प्रशासन(महराष्ट्र चा विशेष)
जिल्हा प्रशांसन ,ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन
न्यायमंडळ न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ - कार्य, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये - लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय संविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनिहत याचिका.
भारतीय पुरावा अधिनियाम १८७२ (Indian Evidence Act)

ASO Mains Syllabus in marathi pdf