https://www.dompsc.com



विभक्ती अव्यव म्हणजे काय-Mpsc Marathi Grammar

विभक्ती अव्यव म्हणजे काय-Mpsc Marathi Grammar

Author

By Shubham Vyawahare

14-April-2024
➤ MPSC राज्यसेवा आणि MPSC combine तसेच MPSC Technical परीक्षा मध्ये मुख्य परीक्षांच्या सत्रात Marathi Grammar चे विशेष महत्व आहे , त्या अनुषंगाने विभक्ती हा पाठ परीक्षेस पूरक मार्क प्रदान करून जातो.

विभक्ती ची व्याख्या

✪ मराठी व्याकरणामध्ये वाक्यातील नामाचा ,सर्वनामाचा ,विशेशनाचा वाक्यातील क्रियापदाशी जो काही संबंध असतो तो संबंध ज्या प्रकारे आहे त्यावरून वाक्याचा अर्थ काढला जातो ,या अर्थाला कारक अर्थ असे म्हणतात.

➤ या अर्थानुसार नाम,सर्वनाम ,विशेषण यामध्ये एक बदल(विकर ) घडतो, याच बदलास विभक्ती असे म्हणतात आणि हा बदल नामाच्या ,सर्वनामाच्या ,विशेषनाच्या माघे अव्यय वापरून केला जातो त्याला विभक्ती अव्यय असे म्हणतात.
● उदा.रामाला भाला मारा.

वरील उदाहरणामध्ये राम हे नाव असून नामाचा क्रियापदाशी संबंध आहे , हा संबंध कर्म स्वरूपातील आहे म्हणजे रामावर क्रिया होत आहे तर हा बदल दाखवण्यासाठी अव्यय वापरला आहे.

पुढील माहिती वरून विभक्ती ओळखा



कर्ता:क्रियापदाने दर्शवलेली क्रिया दाखवण्यासाठी कर्ता असतो , कर्ता प्रथमा विभक्ती मध्ये वापरतात.म्हणजे वाक्याचा कर्ता व क्रियापद यात प्रथमा विभक्ती असते म्हणून प्रथमेचा कारक अर्थ कर्ता होतो.
● उदा. राम वाचत आहे.


कर्म: वाकयामधे एक कर्म असतो ज्या वर क्रिया होत असते अश्या विकराला द्वितीया ने संबोधतात म्हणजेच वाक्याचा कर्ता व क्रियापद यात द्वितीया विभक्ती असते म्हणूनद्वितीयेचा कारक अर्थ कर्म होतो.
● उदा. रामा ला भाला मारा.


करण: वाक्यातील क्रिया ज्या साधनाने म्हणजे ज्याच्या मदतीने होत असते अश्या अव्ययाला करण असे म्हणतात म्हणजे ,क्रियापदाशी अवय्याच्या शब्दाचा करण संबंध असतो म्हणून तृतीये चा कारक अर्थ करण होतो.
● उदा. राम चाकु ने मारत आहे.


संप्रदान : वाक्यातील क्रिया जेवहा दानाच्या स्वरूपात होत असते तेवहा ,हे दान जेवहा ज्याला उद्देशून घडत असत तेवहा त्याला संप्रदान म्हणतात, म्हणून चतुर्थी चा कारक अर्थ संप्रदान असाहोतो.
● उदा. त्यां ना मी दक्षिणा दिली .


अपदान : वाक्यातील क्रिया जिथून घडते आहे त्या स्वरूपाच्या शब्दाला अपदान म्हणतात, म्हणून पंचमी चा कारक अर्थ अपदान असाहोतो.
● उदा. मी पुण्याहून वापस आलो.


अधिकरण: वाक्यातील क्रिया कोठे किंवा केवहा घडली हे दर्शवनर्या शब्दाला अधिकरण म्हणतात , म्हणून सप्तमी चा कारक अर्थ अधिकरण असाहोतो.
● उदा. मी सकाळी उठलो.


संबोधन: कुणाला हाक मारायची असल्यास किंवा संबोधित करायचे असल्यास तो जो सबंध असतो त्याला संबोधन असे म्हणतात , म्हणून संबोधन ही आठवी विभक्ती आहे.
● उदा. राम ,एकडे ये.

● विभक्ती चे किती प्रकार आहेत? ●

विभक्ती प्रत्यय अर्थ
प्रथमा - - कर्ता
द्वितीया स , ला ,ना ,ते कर्म
तृतीया ने,ए ,शी ,नि करण
चतुर्थो स , ला ,ना ,ते संप्रदान
पंचमी उन,हून अपादान
षष्टी चा,ची,चे,च्या,ची संबंध
सप्तमी त,इ,आ अधिकरण
संबोधन नो संबोधन

Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar

Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers

FAQ:विभक्ती अव्यव म्हणजे काय-Mpsc Marathi Grammar

Q.1 विभक्ती म्हणजे काय ?
➤ शब्दाच्या माघे प्रत्यय लागून त्याचा अर्थ स्पष्ट करण्याकरिता वापरले जाणारे अक्षर म्हणजे विभक्ती.

Q.2 मराठी मध्ये किती विभक्ती आहेत ?
➤ मराठी मध्ये ८ विभक्ती आहेत.

Q.3 विभक्ती मधील कारक अर्थ म्हणजे काय ?
➤त्या विभक्ती चा उपयोग कशासाठी केला जातो हे सांगणे म्हणजे कारक अर्थ होय

Q.4 विभक्ती मुळे वाक्यात कोणत्या प्रकारचे विकर होऊ शकते?
➤सहसा विभक्ती मुळे नाम ,सर्वनाम ,विशेषण मध्ये विकर घडतो

Q.5 विभक्ती मधील संबोधन म्हणजे काय ?
➤ कुणाला संबोधित करायचे असल्यास हि विभक्ती वापरतात .

Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List

MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )






Download MPSC Books pdf