https://www.dompsc.com



मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?


Author

By Shubham Vyawahare

6-November-2024

➤Classical Language Marathi :मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ह्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्रीय संसदे पुढे माघनी घातली आहे तरी ह्यासंबंधित अजून केंद्र सरकारचे कोणतेही पाउल उचलले गेले नसून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ह्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत.
➤मराठी भाषेला अभिजात दर्जा नेमका मिळणार तरी कधी...2013 साली राज्य सरकारने नेमेलल्या भाषा समितीचा अहवाल पूर्ण झाला..तेव्हापासून गेली जवळपास दशकभर हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न..काल याबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी उत्तर दिलंय..निर्णय लवकरच होईल आणि तो सकारात्मक असेल.

अभिजात म्हणजे काय ?

प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता म्हणजेच 'अभिजात'
➤ अभिजात भाषा( Classsical Language) हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.

  • भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
  • भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
  • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
  • प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा
➤मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बाराव्या–तेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो. “अभिजात दर्जा” मराठीच्या सर्व चळवळींसाठी फार मोठा उत्प्रेरक अर्थात कॅट्यालिस्ट म्हणून काम करू शकतो.



अभिजात दर्जा कसा मिळतो

➤सर्व अभिजात भाषा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध आहेत. सांस्कृतिक मंत्रालय अभिजात भाषांबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करते
➤भारतात आत्ताच्या घडीला 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे.2004 मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली त्यानंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम आणि 2014 मध्ये ओडिया भाषांना हा दर्जा दिला गेला ➤अभिजात दर्जा मिळालेल्या भाषे साठी भारत सरकारने काही कामे केली आहेतl, ती पुढील प्रमाणे

  • Sanskrit: Rashtriya Sanskrit Sansthan, New Delhi; Maharishi Sandipani Rashtriya Ved Vidya Pratishthan, Ujjain; Rashtriya Sanskrit Vidyapeetha, Tirupati; and Sri Lal Bahadur Shastri Rashtriya Sanskrit Vidyapeeth, New Delhi
  • Telugu and Kannada: Centres of Excellence for Studies in the respective languages at the Central Institute of Indian Languages (CIIL) established by the HRD Ministry in 2011.
  • Tamil: Central Institute of Classical Tamil (CICT), Chennai
➤ महाराष्ट्र सरकारने २०१२ साली रंगनाथ पठारे समिती स्थापन करत भारत सरकार समोर अहवाल सादर केला होता.

भारतातील अभिजात भाषा ला मिळणारे फायदे

➤मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने जुलै 2014 मध्ये लोकसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात एखादी भाषा अभिजात भाषा म्हणून अधिसूचित केल्यावर मिळणारे फायदे स्पष्ट केले आहेत .

  • अभिजात भारतीय भाषांमधील प्रख्यात विद्वानांसाठी दोन प्रमुख वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार
  • अभिजात भाषेतील अभ्यासासाठी उत्कृष्टतेचे केंद्र स्थापन केले आहे
  • केंद्रिय विद्यापीठ आयोगाला (UGC) विनंती करण्यात आली आहे की, किमान केंद्रीय विद्यापीठांमध्ये अशा प्रकारे घोषित केलेल्या अभिजात भाषांसाठी ठराविक व्यावसायिक अध्यक्षांची निर्मिती करावी.

#marathirajbhashadin #Abhijatmarathi #AbhijatMarathi#मराठी #अभिजातमराठी #मराठीभाषागौरवदिन-२०२२ #AbhijatMarathiBhasha #AbhijatMarathi #मराठीभाषादिन #मराठीभाषागौरवदिन #मराठीराजभाषादिन #मराठीभाषादिवस #अभिजातमराठी