https://www.dompsc.com


MPSC hall ticket data leaked before 6 days of exam

MPSC hall ticket data leaked before 6 days of exam

MPSC Website hall ticket data leaked before 6 days of exam

Author

By Shubham Vyawahare

14-April-2024

➤ MPSC Combine Hall ticket leaked :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अधिकृत संकेतस्थळ आज अचानक एका अज्ञात व्यक्तीने hack करत सर्व विध्यार्त्याची महत्वाची माहिती चोरली आहे . तसे पाहता पूर्व परीक्षेचा पेपर ६ दिवसावर असताना अश्या घटनांचा गांभीर्याने विचार करायला हवा.
➤संपूर्ण भारत डिजिटल होत असताना एखाद्या अधिकृत आयोगाची माहिती चोरी व्हावी हि खूप चिंताजनक घटना आहे. केंद्र सरकारच्या सायबर सेक्युरिटी बाबतच्या घटना बघता हि देखील एक चिंताजनक घटना आहे.
➤ दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी एका टेलिग्राम ग्रुप वर अज्ञात व्यक्ती ने हा संदेश पसरवत सुमारे ९० हजार विद्यार्त्याची माहिती चोरली आहे.त्यात त्याने असा दावा केला आहे कि ह्या माहिती सोबतच पुढील आठवड्यामध्ये होणारया MPSC अराजपत्रित गट ब आणि गट क पूर्व परीक्षा २०२३ हा पेपर सुद्धा त्याने चोरला आहे .. हि विद्यार्थ्यांसाठी खूप गंभीर घटना आहे.
खालील data चोरला असा दावा आहे

 • ओनलाईन पोर्टल लोगिन
 • फी पावती
 • उपलोड केलेली कागदपत्रे
 • आधार कार्ड नंबर
 • दूरध्वनी क्रमांक
 • इमेल id
➤ह्या सोबतच त्या अज्ञात व्यक्ती ने असा दावा केला कि पुढील MPSC अराजपत्रित गट ब आणि गट क पूर्व परीक्षा २०२३ चा पेपर सुद्धा चोरला आहे

MPSC Website hall ticket data leaked before 6 days of exam एमपीएससी कडे विद्यार्थांची कोणती माहिती असते ?

➤ MPSC परीक्षार्थी कडून कोणत्याही परीक्षेचा अर्ज भरून घेताना त्या परीक्षार्थी ची वैयक्तिक माहिती जसे नाव जन्म दिनांक पत्ता मोबाईल क्रमांक रहिवासी पत्ता , ईमेल आयडी आधार कार्ड क्रमांक अश्या स्वरूपाचा अतंत्य महत्वाचा वैयक्तिक माहिती तसेच त्या परीक्षार्थी ची शैक्षणिक माहिती जसे की १०,१२, डिग्री चे मार्क तसेच काही परीक्षार्थी अनुभवी असल्यास त्याचा कामाचा अनुभव असा संपूर्ण डाटा असतो
MPSC कडे असलेली माहिती
वैयक्तिक माहिती Name,Mobile Number,Aadhar Card Number,Permanent address,Email Id,Mother name,Date of birth,
शैक्षणिक माहिती 10th Marks,12th Marks,Degree Details,Degree Marks ,Post graduation Details,PHD holder Details
व्यावसायिक अनुभव Any Experience Related Information

MPSC Website hall ticket data leaked before 6 days of exam |एमपीएससी ने ह्या घडलेल्या प्रकारावर काय कारवाई केली ?

 • अनेक मुलांचं हॉलतिकीट लीक झाल्यानंतर सर्व विद्यार्थी संभ्रमात होते की अश्या ३० एप्रिल ला होणारी परीक्षा ही होईल का नाही?...बऱ्याच telegram वर असे संदेश ही फिरत होते की परीक्षा पुढे ढकलला हवी ...
 • सारासार गोष्टीचा विचार करत आयोगानं स्पष्ट केले की तांत्रिक बाबीची पडताळणी केली असता पेपर लीक झाला नसून परीक्षा आहे त्या तारखेला पूर्ण होईल
 • MPSC ची अधिकृत सूचना येथे वाचता येईल MPSC Official Notification On Data leak

Detailed Explanation Of MPSC on Website hall ticket data leaked before 6 days of exam

➤ MPSC ने स्पष्टीकरण देताना सांगितले कि website वरील लोड कमी व्हावा म्हणून बाह्य लिंक उपलब्ध केली असता तीथुन data चोरला आहे

 • दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिध्द होत असल्याची बाब आज रोजी निदर्शनास आली आहे. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. सदर चॅनेलवर प्रसिध्द झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य विदा (डेटा) लिक झालेला नाही, याची तज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे.
 • तसेच सदर चॅनेलवर उमेदवारांचा वैयक्तिक विदा उपलब्ध असल्याचा, तसेच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून अशाप्रकारे कोणताही विदा अथवा प्रश्नपत्रिका लिक झालेली नाही.
 • आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
 • प्रवेशप्रमाणपत्रे लिक करणाऱ्या चॅनेलच्या अॅडमिनविरुध्द सायबर पोलीसांकडे तक्रार देण्यात आलेली असून प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
 • प्रस्तुत प्रसिध्दीपत्रकाद्वारे उमेदवारांना आश्वस्त करण्यात येते की, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच विषयांकित परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.

Expert Explanation On MPSC Website hall ticket data leaked before 6 days of exam

➤ Dr. सोमठाणे कपिलेश्वर सायबर एक्स्पर्ट तज्ज्ञ यांच्या मते.

 • .संबधित कंपनी कडून वेबसाईट ला security देण्यात आली होती ती हॅकर ने उद्वस्थ करून डेटा captured केला आहे.एका प्रकारे malwear attack झालेला आहे
 • हॅकर ला शोधून काढणे सायबर पोलीस यांच्या साठी आव्हान च आहे एवढ्या सहजरीत्या हॅकर पर्यंत पोलीस पोहचू शकेल की नाही या बद्दल सांगणे कठीण आहे
 • बोलतात ना गुन्हेगार किती ही हुशार असला तरी काहीतरी चूक करतोच, तीच चूक त्यांनी टेलिग्राम ला मेसेज टाकून केली आहे. टेलिग्राम वरून ग्रुप कोणी व कुठून ऑपरेट केला हे सहज समजेल व पोलीस त्या व्यक्ती पर्यन्त पोहचून त्याच्या कढून काही धागेदोरे मिळून तपास करतील.
 • तुमची वयक्तिक माहिती जेवढी ऍडमिट कार्ड वर दिलेली आहे तेवढी नक्कीच लीक झालेली आहे. सिस्टिम मधे in डेप्थ हॅकिंग झालेलं असेल तर त्यांनी मेसेज मधे नमूद केल्या प्रमाणे सगळा डेटा capture करण अवघड नाहीये. त्यामुळे कदाचित तो डेटा त्याच्या असेल ही आणी या बाबत mpsc ही बाब कधी ही मान्य करणार नाही की डेटा गेला नाही म्हणून.
 • 30 एप्रिल ला होणाऱ्या पेपर च्या प्रश्नपत्रिका लीक झाली नसेल कारण पेपर हा ऑफलाईन होता त्या मुळे प्रश्नपत्रिका या ऑनलाईन प्लॅटफॉर्म ला उपलब्ध करण्याचं काही ही संबंध येत नाही. त्या मुळे मला असं वाटत की विध्यार्थी यांनी निश्चित राहावं पेपर लीक झालं नसेल.

MPSC Website hack चा combine पूर्व परीक्षेवर काही परिणाम होईल का?

 • MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर पुढील -MPSC Official Notification On Data leak निवेदन प्रसिद्ध करत , MPSC आयोगाने स्पष्ट सांगितले आहे कि वरील घटनेचा परीक्षेवर काहीही परिणाम होणार नाही, तसेच परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ३० एप्रिल रोजीच होईल.

FAQ:MPSC hall ticket data leaked before 6 days of exam

Q.1 Is MPSC Website Hacked?
➤ Yes,On 23 April 2023 website has been hacked and leak all information of the candidate

Q.2 Is MPSC Official Insecure ??
➤ Not , It is secured by company

Q.3 Will MPSC Exam Postponed Due to Website Hack?
No,MPSC Officially declared about not postponing exam.

Q.4 Is combine Pre Paper Hacked
➤No there is no any official announcement regarding exam

Q.5 Is MPSC Website Down Due to Hack?
➤ No,Its working fine.