https://www.dompsc.com


केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi

केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION 
OF COACHING CENTER in marathi

GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER

Author

By Shubham Vyawahare

11-October-2024

GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER :केंन्द्रीय उच्च शिक्षण मंत्रालया द्वारे १९ जानेवारी २०२४ रोजी खाजगी क्लासेस बद्दल नियमावली लागू करण्यात आलेली आहे ह्याची संपूर्ण अंबलबजावणी केंद्रीय पातळीवर करण्यात येणार असून ,राज्य पातळीवर राज्य शिक्षण मंत्रालयास जवाबदारी देण्यात आलेली आहे.ह्या नियमाचा खाजगी क्लासेस वर अचानक परिणाम झाला असून नवीन नियमानुसार त्यांना काही नियम अंगीकृत करून घ्यावे लागणार आहेत.

GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER

Ministry Details
Department of Higher Education, Ministry of Education Government of India Guidelines for Private Coaching Classes
date 19 Jan 2024
Official Link for the new Guidelines New official Guidelines

reason Behind GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi

Reason Behind GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER:केंदीय उच्च शिक्षण मंत्रालयाने भारतात माघील काही घटनेच्या आधारे नवीन नियमावली लागू केली.

  • वाढत्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात खाजगी कोचिंग सेंटरशी संबंधित समस्या अधिक आहेत जसे कि आत्महत्या प्रकरणे, आगीच्या घटना, सोयीसुविधांचा अभाव तसेच शिकवण्याच्या पद्धती अशा अनेक घटना घडल्या आहेत ह्या घटनामुळे केंद्र सरकारचे लक्ष ओढून घेतले आहे
  • जास्त शुल्क आकारत देशात अनियंत्रित खाजगी कोचिंग सेंटर्सची संख्या सातत्याने वाढत आहे आणि त्यावर कोणतेही निश्चित धोरण किंवा नियमन नसणे हेच सुद्धा ह्यामाघील एक कारण आहे.
  • स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया विरुद्ध UOI आणि इतरांच्या बाबतीत 2013 च्या WP क्रमांक 456 मध्ये जनहित याचिका माननीय सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले ज्यामध्ये शिक्षण मंत्रालय हे एक होते
  • वाढत्या आत्महत्या संबंधात Roopanwal Commission आणि नवीन नियमासाठी Ashok Mishra Committee Report ह्यांनी सदर केलेल्या आधारावर नियमावली बनवली गेली आहे

➤दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने खाजगी क्लासेस संबंधित एक नियमावली जरी केली ते download करण्यासाठी click करा


Objective of GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER

➤ कोचिंग सेंटरच्या नियमनासाठी उद्दिष्ट:विद्यार्थांना परीक्षा ,स्पर्धा परीक्षा आणि त्यांच्या अभ्यासक्रमांतील नियमनासाठी ह्या अटी तयार करण्यात आलेल्या आहेत

  • कोचिंग सेंटर चालवण्यासाठी किमान मानक आवश्यकता सुचवणे.
  • कोचिंग सेंटरमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करणे
  • कोचिंग सेंटर्सना सह-अभ्यासक्रम क्रियाकलापांवर तसेच समग्रतेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देणे विद्यार्थ्यांचा विकास
  • मानसिक आरोग्यासाठी करिअर मार्गदर्शन आणि मानसशास्त्रीय समुपदेशन प्रदान करणे विद्यार्थीच्या


New Changes as per GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER

New Changes as per GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER नवीन नियमावली मध्ये काही बदल केलेले आहेत ते पुढील प्रमाणे

कोचिंग म्हणजे नेमके कोण ?

➤ कोचिंग’ म्हणजे शिक्षणाच्या कोणत्याही शाखेतील शिकवणी जी ५० पेक्षा जास्त मुलांना एकत्र सूचना आणि मार्गदर्शन करते ह्यात समुपदेशन, क्रीडा, नृत्य, नाट्य आणि इतर creative activities समाविष्ट नाही आहेत.

नवीन क्लासेस साठी नोंदणी आवशयक

➤ देशातील कुठलेही क्लासेसना अजून तरी नोदणी महत्वाची केली न्हवती पण नवीन नियमावली नुसार त्यांना नोंदणी आवश्यक केली आहे.
➤ वार्षिक फीस आकारणी हि खूप मोठ्या प्रमाणत आकारता येणार नाही
➤ प्रत्येक क्लासेस मध्ये आवश्यक आग विषयी उपकरणे ,पिण्याच्या पाण्याची सुविधा ,आवश्यक प्रतम उपचार साहित्य ,cctv ,तसेच आवश्यक गोष्टी असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे
➤क्लासेस हे शासकीय शाळेच्या वेळेत नसायला हवीत ,तसेच दिवसभरातून ५ तासापेक्षा जास्त वेळ क्लासेस चालवता येणार नाही
➤प्रत्येक क्लासेस ची स्वतंत्र website असावी आणि १६ वर्ष्या खालील मुलाला admission देता येणार नाही
➤विद्यार्त्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार केला पाहिजे
➤संपूर्ण विद्यार्त्याचे रेकॉर्ड maintain केले पाहिजे

Penalty included in GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER

civil procedure code 1908 (Central Act no. 5 of 1908) नुसार प्रथम चुकीस २५००० रुपये दंड तर दुसर्या चुकी साठी १०००० एवडा दंड आकारण्यात येण्यात आला आहे.आणि तरीही कार्यवाही करण्याची वेळ आल्यास क्लासेस ची नोंदणी सुद्धा काढून घेता येऊ शकते.

ह्या संबंधित क्लासेस मालक सुद्धा कोर्टात दाद मागू शकतात.

FAQ:केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi

Q.1 कोचिंग क्लास्सेस वर कोण नियम लादु शकते ?
➤ केंद्रीय शिक्षण मंत्रालय

Q.2 कोचिंग क्लासेस चे सर्वात जास्त जाळे कुठे आहे ?
➤ भारतातील शहरात प्रमाण जास्त आहे .

Q.3 खाजगी क्लासेस सुरु करण्यास काही पात्रता आहे का?
➤नवीन नियमावली नुसार त्या क्षेत्रातील पदवीधर हवा

Q.4 खाजगी क्लासेस साठी किमान वय किती ठरवले आहे?
➤१६ वर्ष

Q.5 खाजगी संस्थांनी नियमावली न पाळल्यास दंड भरावा लागतो का?
➤ खाजगी क्लासेस च्या नवीन नियमावली मध्ये 1 लाख दंड ठरवला आहे