https://www.dompsc.com

Download MPSC Mains GS3 Syllabus In Marathi

Download MPSC Mains GS3 Syllabus In Marathi

Read MPSC Mains Syllabus For GS 1

➤महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही संस्था महाराष्ट्र राज्य सरकारी अधिकारी राज्यसरकार ला नियुक्त करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्यात कार्य करते ,ही परीक्षा राज्यसेवा परीक्षा या नावाने घेतली जाते .MPSC ची ही परीक्षा ३ टप्प्यात नियोजित असून MPSC Mains Syllabus चा अभ्यास करूनच अभ्यासाला सुरुवात करता येते.
➤MPSC Mains paper मध्ये GS1, GS2,GS3,GS4 विषयाचे पेपर असून भाषा विषयासाठी इंग्रजी व मराठी भाषेचा लेखी स्वरूपाचा पेपर असतो.
➤MPSC Mains GS3 Syllabus हा मानवी विकास व मानवी हक्क आणि अधिकार या विषयाशी निगडित असून त्याचा MPSC Mains Syllabus खूप मोठा आहे, तसेच MPSC Mains Gs 3 हा योजना,कायदे ,नियमन या संबंधित आहे तर याच्या MPSC Mains Syllabus मध्ये आता चालू घडामोडी सुद्धा वाचाव्या लागतील. Gs 3 मध्ये मुख्य भर हा मानव संसाधन व मानवी हक्क यावर असतो.तर GS4 चा MPSC Mains Syllabus हा अर्थशास्त्राची ओळख करून देतो.

MPSC Mains GS 3 Syllabus:Human Development

Point Topics
१.मानव संसाधन विकास
१.१ भारतातील मानव संसाधन विभाग भारतातील लोकसंख्येची सध्य:स्थिती - संख्यात्मक स्वरूप (आकारमान, वृद्धी, वृद्धीदर, वय, लिंग, ग्रामीण आणि नागरी लोकसंख्या, जन्मदर, मृत्यूदर), गुणात्मक स्वरूप (शिक्षण, आरोग्य, मानव विकास निर्देशांक, लोकसंख्या धोरण, लोकसंख्या विस्फोट, २०५० पर्यंतचे लोकसंख्या धोरण व नियोजन, आधुनिक समाजातील मानव संसाधनाचे महत्व आणि आवश्यकता, मानव संसाधन नियोजनामध्ये अंतर्भूत असलेली विविध तत्वे आणि घटक, भारतातील बेरोजगारीची समस्या, स्वरूप आणि प्रकार, भारतातील रोजगार क्षेत्रातील कल, विभिन्न उद्योग विभाग आणि क्षेत्रातील कुशल कामगारांची मागणी, बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाचे धोरण व विविध योजना, मानव संसाधन व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्था यू.जी.सी., ओ.आय.सी.टी.ई., एन.सी.टी.ई., रुसा, आय.टी.आय., एन.सी.व्ही.टी., आय.एम.सी., एन.सी.ई.आर.टी., एन.आय.ई.ए., आय.आय.टी., आय.आय.एम.).
१.२ शिक्षण मानव संसाधन विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार, भारतातील (पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण) शिक्षण प्रणाली (शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचे व्यवसायिकीकरण, दर्जावाढ, गळतीचे प्रमाण इत्यादी ) समस्या आणि प्रश्न, मुलींकरिता शिक्षण, सामाजिकदृष्टया व आर्थिकदृष्टया गरीब वर्ग, अधू, अल्पसंख्य, कौशल्य शोध इत्यादी. शासनाची शैक्षणिक धोरणे, योजना व कार्यक्रम, अनौपचारिक, औपचारिक आणि प्रौढ शिक्षणाचा प्रसार विनियमन आणि सनियंत्रण करणाऱ्या शासकीय व स्वयंसेवी संस्था, ई-अध्ययन, जागतिकीकरण आणि खाजगीकरण याचा भारतीय शिक्षणावरील परिणाम, राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोग, आयआयटी, आयआयएम, एनआयटी. शिक्षणाचा हक्क -२००९, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०१९ अद्ययावत केल्याप्रमाणे.
१.3 व्यावसायिक शिक्षण मानव संसाधन विकासाचे साधन म्हणून व्यावसायिक शिक्षणाचा विचार, व्यावसायिक/तंत्रशिक्षण - भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील सद्यस्थिती, शिक्षणप्रणाली व प्रशिक्षण, शासकीय धोरणे, योजना व कार्यक्रम - समस्या, प्रश्न व त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न, व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणाचा प्रसार, विनियमन करणाऱ्या आणि अधिस्वीकृती देणाऱ्या संस्था. NSDC (राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ)
  • राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम
  • ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षण भेदण्याची रणनीती
  • उद्योग संस्था भागीदारी (इंटर्नशिप आणि अपरेंटिसशिप)
  • क्षेत्रनिहाय रोजगाराच्या संधी
  • एखाद्याचे स्वतःचे उद्योजक एकक सेट अप करत आहे
  • लहान वयात व्यावसायिक शिक्षणाचा परिचय (प्राथमिक शिक्षण वयोगटानंतर १४+)
  • सेवा क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण (आतिथ्य, रुग्णालये, पॅरामेडिक्स इ.)
  • महिला सबलीकरणासाठी व्यावसायिक शिक्षण
  • अद्ययावत केल्याप्रमाणे व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित सरकारी कार्यक्रम
  • व्यावसायिक शैक्षणिक- शिक्षणाचे राष्ट्रीय धोरण -२०१९ (एनईपी २०१९)
१.४ आरोग्य जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू. एच. ओ.) – उद्देश, रचना, कार्य आणि कार्यक्रम, भारताचे आरोग्यविषयक धोरण, योजना आणि कार्यक्रम, भारतातील आरोग्य सेवा यंत्रणा, भारतातील आरोग्यविषयक महत्वाची आकडेवारी, भारतातील आरोग्यविषयक घटक आणि समस्या (कुपोषण, माता मर्त्यता दर, इ.), जननी-बाल सुरक्षा योजना, नॅशनल रूरल हेल्थ मिशन, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (पी.एम.एस.एस.वाय.)
१.५ ग्रामीण विकास पंचायत राज व्यवस्था सक्षमीकरण, ग्रामपंचायतीची विकासातील भूमिका, जमीन सुधारणा आणि विकास, शेती आणि शेतकरी कल्याणविषयक विविध योजना आणि कार्यक्रम, ग्रामीण विकासात सहकारी संस्थांची भूमिका, ग्रामीण विकासात अंतर्भूत असणाऱ्या वित्तीय संस्था (एस.एच.जी., सूक्ष्मवित्त), ग्रामीण रोजगार योजना, ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता कार्यक्रम, ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत विकास उदा. ऊर्जा, परिवहन, गृहनिर्माण आणि दळणवळण, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (NREGS), मिशन अंत्योदया, ग्राम स्वराज्य अभियान.

MPSC Mains GS 3 Syllabus:Human Rights

२ मानवी हक्क
२.१ जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र (युडीएचआर १९४८) मानवी हक्काची आंतरराष्ट्रीय मानके, त्याचे भारताच्या संविधानातील प्रतिबिंब, भारतात मानवी हक्क राबविण्याची आणि त्याचे संरक्षण करण्याची यंत्रणा, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित असलेल्यांच्या समस्या जसे गरीबी, निरक्षरता, बेरोजगारी, सामाजिक - सांस्कृतिक - धार्मिक प्रथा, हिंसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, पोलीस कोठडीतील कैद्यांवरील अत्याचाराचा मुद्दा, लोकशाही चौकटीत मानवी हक्क आणि मानवी सभ्यतेचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज, जागतिकीकरण आणि त्याचा विभिन्न क्षेत्रांवरील परिणाम, मानवी विकास निदेशांक, बालमृत्यू प्रमाण, लिंग गुणोत्तर.
२.२ बालविकास समस्या व प्रश्न (अर्भक मृत्यू, कुपोषण, बालकामगार, मुलांचे शिक्षण, इत्यादी ) शासकीय धोरण, कल्याणकारी योजना आणि कार्यक्रम, बालविकास आणि आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका, स्वयंसेवी संघटना, अशासकीय संस्था, सामुदायिक साधने, चाईल्ड लेबर – प्रोहिबिशन अँड रेग्यूलेशन अॅक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्स्यूअल ऑफेन्स अॅक्ट, इंटीग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस (आय. सी. डी. एस)
२.3 महिला विकास महिलाविषयक समस्या व प्रश्न (स्री - पुरूष असमानता, महिलांविरोधी हिंसाचार, लिंग प्रमाण, स्त्री अर्भक हत्या / स्त्री भ्रूण हत्या इ.) महिला विकासासाठी शासकीय धोरण, योजना आणि कार्यक्रम, महिला विकास आणि महिला सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय संघटनाची कार्ये, स्वयंसेवी संघटना आणि सामुदायिक साधने, अॅक्रीडीएटेड सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट (ओ. एस .एच. ओ.)
२.४ युवकांचा विकास समस्या व प्रश्न (बेरोजगारी, असंतोष, अंमलीपदार्थाचे व्यसन, इत्यादी) शासकीय धोरण, विकास योजना आणि कार्यक्रम - आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सामुहिक साधने, नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड आंध्रप्रेन्युरशिप, राष्ट्रीय युवा धोरण.
२.५ आदिवासी विकास समस्या व प्रश्न (कुपोषण, एकात्मीकरण आणि विकास, इ.) शासकीय धोरण, विकास योजना आणि कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सामुहिक साधने, जंगलविषयक अधिकार कायदा.
२.६ सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास समस्या व प्रश्न (संधीतील असमानता इत्यादी) - शासकीय धोरण, कल्याण योजना व विकास कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवा संघटना व साधन संपत्ती संघटित करुन कामी लावणे व सामुहिकसहभाग.
२.७ वयोवृध्द लोकांचे कल्याण समस्या व प्रश्न - शासकीय धोरण - कल्याण योजना व कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना यांची भूमिका आणि वयोवृध्दांच्या विकासासाठी सामुहिक सहभाग, विकासविषयक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या सेवांचे उपयोजन.
२.८कामगार कल्याण समस्या व प्रश्न (कामाची स्थिती, मजुरी, आरोग्य आणि संघटित व असंघटित क्षेत्रांशी संबंधित समस्या) - शासकीय धोरण, कल्याण योजना व कार्यक्रम - आंतरराष्ट्रीय संस्था, समाज व स्वयंसेवी संघटना.
२.९ विकलांग व्यक्तींचे कल्याण समस्या व प्रश्न (शैक्षणिक व रोजगार संधी यामधील असमानता इत्यादी) - शासकीय धोरण, कल्याण योजना व कार्यक्रम - रोजगार व पुनर्वसन यामधील आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना यांची भूमिका
२.१० लोकांचे पुनर्वसन (विकास प्रकल्प व नैसर्गिक आपत्ती यांमुळे बाधित लोक) कार्यतंत्र धोरण व कार्यक्रम - कायदेविषयक तरतुदी - आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, मानसशास्त्रीय इत्यादींसारख्या निरनिराळया पैलूंचा विचार.
२.११ आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना संयुक्त राष्ट्रे आणि तिची विशेषीकृत अभिकरणे - UNCTAD, UNDP, ICJ, ILO, ___UNICEF, UNESCO, UNCHR/ UNHRC, APEC, ASEAN, OPEC, OAU, SAARC, NAM, Common wealth of Nations, European Union, SAFTA, NAFTA, BRICS, RCEP
२.१२ ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ व्याख्या, उद्दीष्ट, विद्यमान अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये- ग्राहकांचे हक्क -ग्राहक विवाद व निवारण यंत्रणा, मंचाचे निरनिराळे प्रकार, कार्यक्षेत्र/अधिकार क्षेत्र, अधिकार, कार्य, ग्राहक कल्याण निधी, अपिल
२.१३ मूल्ये, नितीतत्त्वे आणि प्रमाणके सामाजिक प्रमाणकांची जोपासना - सामाजीकरण, कुटूंब, धर्म, शिक्षण, प्रसारमाध्यमे, इ. या सारख्या औपचारिक व अनौपचारिक संस्थामार्फत सामाजिक मानके, मूल्ये व नितीतत्वाची जोपासना.

Read MPSC Mains Syllabus

Download MPSC Mains Syllabus in Marathi
Connect With Us


Subscribe Us For Updates


Submit To Get Current Affairs 2022 Question Bank for Free! Free! Free!