https://www.dompsc.com



महात्मा फुले यांचे जीवन आणि कार्य

महात्मा फुले यांचे जीवन आणि कार्य

थोडे दिन तरी मद्य वर्ज करा ।
तोच पैसा भरा । ग्रंथासाठी ।।
ग्रंथ वाचताना मनी शोध करा ।
देऊ नका थारा वैरभावा ।।

➤ माळी कुटुंबामध्ये जन्माला आलेले महात्मा जोतिराव फुले हे एक वर्षाचे असतानाच त्यांची ११ एप्रिल १८२७ रोजी गोविंदराव व चिमणाबाई यांना एक पुत्ररत्न पुणे येथे जन्माला आले..
➤ माधवराव पेशव्यांनी त्यांना फुलांच्या उत्पादनासाठी २५ एकर जमीन दिली. त्यामुळे त्यांचा फुलांचा व्यवसाय जोरात सुरू झाला. फुलांच्य व्यवसायावरूनच त्यांना 'फुले' हे नाव पडले. त्यांचे मूळ आडनाव 'गोव्हे' होते
➤ ११ मे १८८८ मुंबई येथे रावसाहेब वादेदार यांच्यातर्फे महात्मा हि पदवी बहाल.

महात्मा फुले यांची वैयक्तिक माहिती


मुद्दा माहिती
जन्म ११ एप्रिल १८२७
स्थळ सातारा जिल्ह्यात कठाव तालक्यातील कटगुण
शिक्षण स्कॉटिश मिशन हायस्कूल
प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती थोमस पेन

महात्मा फुले यांची पुस्तके आणि संपादन

  • तृतीय रत्न
  • छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा
  • विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी
  • ब्राह्मणांचे कसब
  • गुलामगिरी
  • सत्यशोधक समाज हकिकत व निबंध
  • हंटर शिक्षण आयोगापुढील निवेदन
  • शेतकऱ्यांचा आसूड
  • इशारा
  • सत्सार-१ (दि इसेन्स ऑफ टुथ)
  • सत्सार -२
  • सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकांसह सर्व पूजा-विधी
  • अस्पृश्यांची कैफियत
  • सार्वजनिक सत्यधर्म
  • अखंडादि काव्यरचना (मरणोत्तर प्रकाशित)


महात्मा फुले यांचे धार्मिक विचार

  • थॉमसे पेनप्रमाणे - एकेश्वरवादी
  • ईश्वराला 'निर्मिक' म्हणत.सर्वांचा नियंत्रक - निर्मिक,
  • सर्व मानवांचा एकच धर्म असावा, एक धर्म-एक ईश्वर
  • मूर्तिपूजा, अवतार कल्पनांना विरोध
  • ईश्वर उपासनेला - मध्यस्थाची गरज नाही
  • ईश्वरावर विश्वास, सत्याचा शोध आणि नीतीची जोपासना ही तीन तत्त्वे त्यांच्या धर्मविषयक विचारांचा

महात्मा फुले यांचे सामाजिक विचार

  • जन्मसिद्ध, नैसर्गिक अधिकाराचे समर्थन
  • वर्णव्यवस्था, जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रियांवरील अन्याय यावर टीका.
  • स्त्रियांना मानवी हक्कांची जाणीव होऊ नये, या इराद्याने लोभी पुरुषांनी त्यांना विद्या शिकवण्यास प्रतिबंध केला, असे मत त्यांनी मांडले
  • सामाजिक सुधारणांबाबत सरकारच्या तटस्थ वृत्तीवर जोतीरावांचा आक्षेप होता.

महात्मा फुले यांचे शिक्षण विषयक विचार

  • ब्रिटिशांचे शै. धोरण त्यांना मान्य नव्हते. उच्चवर्णियांसाठी पुष्कळ खर्च होतो पण खेड्यातील लोकांच्या शिक्षणासाठी खास प्रयत्न होत नाहीत.
  • १८८२ च्या हंटर आयोगाकडे पाठवलेल्या निवेदनात जोतीबा म्हणतात(खेड्यापाड्यात प्राथमिक शिक्षणाची सोय करावी
  • शिक्षण असे असावे की, तरुणांमध्ये स्वत:चा व्यवसाय करण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे.

महात्मा फुले यांची हंटर आयोग समोर साक्ष


➤ लॉर्ड रिपन यांच्या कारकीर्दीत सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली ३ १८८२ रोजी एक शिक्षण आयोग नियुक्त केला होता, महात्मा फुले यांनी १९ ऑक्टोड रोजी पुणे येथे हंटर शिक्षण आयोगाला शिक्षणाच्या बाबतीत सविस्तर निवेदन निवेदनात त्यांनी सरकारला पुढील सूचना केल्या.
➤१२ वय वर्षे असलेल्या सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे.
➤आदिवासी जाती-जमातींना शिक्षणात प्राधान्य देण्यात यावे.
➤ लोकल सेस फंडापैकी जास्त भाग प्राथमिक शिक्षणावर खर्च करावा.
➤प्राथमिक शाळांना प्रांतिक सरकारने भरपूर अनुदान द्यावे.
➤प्राथमिक शाळांवर होणाऱ्या खर्चाची जबाबदारी नगरपालिकांनी घ्यावी.

महात्मा फुले यांनी काढलेल्या शाळा

वर्ष ठिकाण
३ ऑगस्ट १८४८ भिडेवाडा, पुणे
१ मे १८४८ हडपसर, पुणे
२० डिसेंबर १८४८ सासवड, पुणे
१५ जुलै १८४९ नायगाव,सातारा
१ सप्टेंबर १८४९ तळेगाव ढमढेरे,पुणे
१९ सप्टें. १८५० भिंगार
१८ जुलै १८४९ शिरवळ

➤ महात्मा ज्योतीराव फुले यांचा मृत्यू २८ नोव्हेंबर १८९० ला झाला

महात्मा फुले Short Notes

  • सार्वजनिक सत्यधर्म स्थापना
  • सत्यशोधक समाज कार्य
  • कामगार चळवळ सहभाग-मिल हेंड असो. ची स्थापना
  • पुना लायब्ररी
  • १८५३ बालहत्या प्रतिबंधक गृह
  • दीनबंधू चे संपादन
  • व्यसनमुक्ती प्रयन्त

Download महात्मा फुले यांचे जीवन आणि कार्य In PDF

➤ वरील सर्व माहिती हि MPSC च्या पूर्व मुख्य आणि मुलाखत या सर्व स्तरावर उपयोगी पडणारी आहे






Download MPSC Books pdf