https://www.dompsc.com


समास व समासाचे प्रकार -मराठी व्याकरण

Marathi Grammar samas


समास व समासाचे प्रकार -मराठी व्याकरण

✪ ❝ मराठी भाषेमध्ये दोन शब्दापासुन तीसरा किंवा जोडशब्द बनवताना जे नियम वापरल्या जातात त्याना समास असे म्हणतात.

● समास म्हणजे जोडअक्षरे बनवण्याची प्रकिया.
● मराठी व्याकरणामध्ये संधी आणि समास या मध्ये मुळात हाच फरक आहे की समास हा जोडाक्षर बनवताना वापरल्या जातो तर संधी ही शब्द निर्मिती प्रक्रिया वापरली जाते .
● समासा मध्ये कोणत्या शब्दाला किंवा त्यांच्या स्थानाला महत्व दिले आहे यावरून त्याचे प्रकार पाडले जातात.
● समास या संकल्पनेमुळे मराठी भाषेला समृद्ध करणारी शब्द्निर्मिति यंत्रणा मिळाली आहे.

✪ मराठी व्याकरनामध्ये समासाचे काही प्रकार पडतात

  1. अव्ययीभाव समास - पहिला शब्द महत्वाचा असतो.
  2. तत्पुरुष समास - दूसरा शब्द महत्वाचा असतो.
  3. द्वंद्व समास - दोन्ही शब्दे महत्वाची.
  4. बहुव्रीहि समास - दोन्ही शब्दे कमी महत्वाची.

✪ समास व् समासाचे प्रकार पुढीलप्रमाणे


अव्यव्यीभाव समास

ज्या समासामध्ये पहिला शब्द कर्ता धर्ता असून त्याचे स्थान हे शब्दाचा अर्थ समजताना महत्वाचे असते त्यालाअव्यव्यीभाव समास असे म्हणतात.
● ❝उदा.प्रतिदिन -प्रत्येक दिवशी
प्रतिक्षण -प्रत्येक क्षणी
➤ वरील उदाहरनामध्ये पहिला शब्द हा अति महत्वचा वाटला व त्यानुसार शब्दाला अर्थ प्राप्त झाला आहे.

तत्पुरुष समास

ज्या समासा मधे दुसरे पद महत्वाचे असून अर्थाच्या दृष्टीने न वापरलेले विभक्ति प्रत्यय परत वापरतात त्याला तत्पुरुष समास म्हणतात.
● उदा.तोंडपाठ-तोंडाने पाठ

✪ तत्पुरुष समासाचे प्रकार ✪



अ)समानाधिकरण
●तत्पुरुष समासातील दोन्ही पदे विग्रहाच्या वेळी एकाच विभक्ति मध्ये असतात तेव्हा त्याला समधिकरण समास म्हणतात.
उदा. काळमांजर - काळ + मांजर

आ) व्यधिकरण समास
● ज्या समसाचा विग्रह करताना पदे वेगळ्या विभक्ति मधील असतात तेव्हा त्याला व्यधिकरण समास असे म्हणतात.
उदा .देवपूजा -देवाची पूजा .

✪ तत्पुरुष समासाचे प्रकार ✪



अ ) विभक्ति तत्पुरुष समास
:ज्या तत्पुरुष समासा मध्ये कोणत्या तरी विभक्ति चा लोप करुण किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप करुन ती जोडली जातात तेव्हा त्याला विभक्ति तत्पुरुष समास म्हणतात.
● उदा.देवाप्राप्त-देवाला प्राप्त .
वरील शब्दा मध्ये द्वितीया विभक्ति चा लोप झालेला आहे.

आ ) अलुक तत्पुरुष समास
:ज्या विभक्ति तत्पुरुष समासा मध्ये पूर्वपदाचा विभक्तिचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात .
● उदा.अग्रेसर - अग्रे मध्ये सप्तमी प्रत्यय लोप पावत नाही.

इ ) उपपद तत्पुरुष समास
:काही सामासिक शब्दात दूसरी पदे कृदंते असतात व ती वाक्यात स्वतंत्रपाने उपयोगात आणता येत नाहीत त्याना उपपद किंवा कृदंते तत्पुरुष समास असे म्हणतात .
● उदा.ग्रंथकार-ग्रन्थ करणारा.
➤नुसत्या करणारा पासून येथे काहीच अर्थ अभिप्रेत होत नाही म्हणून उपपद तत्पुरुष समास होतो.

ई ) नत्र तत्पुरुष समास
:ज्या समासात पाहिले पद नकारार्थी असते त्याला नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात .
● उदा.नास्तिक -नाही आस्तिक असा.

उ ) कर्मधारय तत्पुरुष समास
:ज्या समासात दोन्ही पड़े एकाच विभक्ति मधील असतात तेव्हा त्याला कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतात .
● उदा.महादेव -महान असा देव.

ई ) मद्यम पदलोपी तत्पुरुष समास
:ज्या समासात मध्यम पद जे असते ते काढावे लागते अश्या समासाला मध्यमपदलोपी तत्पुरुष समास असे म्हणतात .
● उदा.कांदे पोहे - कांदे असलेले पोहे .
साखर भात -साखर घालून केलेला भात.

द्वन्द समास

: ज्या समासामध्ये दोन्ही पदे ही सारखीच महत्वाची असतात तेव्हा त्याला द्वन्द समास असे म्हणतात.
✪ उदा.खरे किंवा खोटे
अ) इतरेतर द्वन्द समास:समास विग्रह करताना ज्यावेळी आणि नावाचा वापर केल्या जातो तेव्हा त्याला इतरेतर द्वंद समास असे म्हणतात.
● उदा.आई बाप -आई आणि बाप

आ) वैकल्पित द्वन्द समास:समास विग्रह करताना ज्यावेळी किंवा अथवा याचा वापर होतो म्हणजेच ज्याठीकानी विकल्प असतो तेव्हा त्याला वैकल्पित द्वन्द समास असे म्हणतात.
● उदा.खरे किंवा खोटे

इ ) समाहार द्वन्द समास :विग्रह करताना त्या शब्दसोबत इतर त्याअर्थी काही शब्द येतात तेव्हा त्याला समाहार द्वंद समास असे म्हणतात.
● उदा.मीठ भाकर - मीठ भाकरी व इतर खाद्य.

बहुव्रीहि समास

:बहुविरिही समासा मध्ये समास झाल्यानंतर पहिला किंवा दूसरा शब्द महत्वाचा नसून तिसराच शब्द महत्वाचा मानतात तेव्हा त्याला बहुव्रीहि समास असे म्हणतात.
● उदा.नीलकंठ- नीला आहे ज्याचा कंठ असा तो (शंकर )- या उदाहरणामध्ये पाहिले दोन शब्द महत्वाचे नसून तिसराच शब्द महत्वाचा निघाला.



अ) विभक्ती बहुव्रीहि समास:समासाचा विग्रह करताना यात एक सर्वनाम उपलब्ध असते व् ते सर्वनामा कोणत्या विभक्ति मधे आहे त्यावरन त्याला विभक्ति बहुव्रीहि समास असे म्हणतात.
● उदा.गजानन - गज आहे ज्याला - यात चतुर्थी विभक्ती सर्वनामाला वापरलेली आहे यावरून हे स्पष्ट होते की हा चतुर्थी बहुव्रीहि समास आहे .

आ) नत्र बहुव्रीहि समास:ज्या समासामध्ये पाहिले पद हे नकारार्थी असते त्याला नत्र बहुव्रीहि समास असे म्हणतात.
● उदा.अनेक .
निरोगी- नाही रोगी असा तो.

इ) सहबहुव्रीहि समास:ज्या समासामध्ये पाहिले पद हे सह किंवास असून सामासिक शब्द हे विशेषण असते तेव्हा त्याला नत्र बहुव्रीहि समास असे म्हणतात.
● उदा.सादर - आदर सहित असा.
सफल- कुटुम्बा सहित असा.

इ) प्रदीबहुव्रीहि समास:ज्या समासामध्ये पाहिले पद हे प्र , परा ,अप ,सु , वी अशा शब्दानी युक्त असेल तर त्याला प्रदीबहुव्रीहि समास असे म्हणतात.
● उदा.दुर्गुनी- गुण नाहीत असा तो.

Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar

Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers

Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List

MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )






Download MPSC Books pdf


Connect With Us


Subscribe Us For Updates


Submit Your Email ID And Download Current Affairs 2023 Question Bank , Free! Free! Free!