https://www.dompsc.comBiodiversity(जैव विविधता वितरण)|MPSC Environment(पर्यावरण) Notes

Biodiversity(जैव विविधता वितरण)|MPSC Environment(पर्यावरण) Notes


✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪

Biodiversity(जैव विविधता वितरण) वितरण म्हणजे काय?

Author

By Shubham Vyawahare

10-July-2024
➤जैवभूगोल ही वनस्पती आणि प्राणी यांच्या भौगोलिक वितरणाशी संबंधित असणारी ज्ञानशाखा आहे.
➤जगातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आढळणारे जीवसमुदायअनेकार्थांनी परस्परांपासून भिन्न आहेत.
➤जैवभूगोल या शाखेच्या दोन उपशाखा आहेत.
(1) वनस्पती भूगोल:
➤ यामध्ये वनस्पतींची उत्पत्ती, वितरण आणि पर्यावरणाशी असणाऱ्या परस्परसंबंधांचा अभ्यास केला जातो.
(2) प्राणी भूगोलः
➤ प्राण्यांचे स्थलांतर आणि भौगोलिक वितरणाशी संबंधित असणारी ही शाखा आहे.
➤ जगातील 17 महाविविधता केंद्रांपैकी (Megadiversity Centres) भारत एक आहे.
➤ भारतामध्ये प्रमुख 10 जैवभौगोलिक विभाग (Biogeographic Zones) आहेत.
(1) ट्रान्स हिमालयीन विभागः
➤ भारताचा सर्वांत उत्तरेकडील भाग या विभागात येतो.
➤ या विभागात पर्वतीय प्रदेशांबरोबरच, पर्वतांभोवताली असणाऱ्या प्रदेशांचा समावेश होतो.
वैशिष्ट्ये
  • अनियमित वनस्पती वितरण (Irregular vegetation)
  • या प्रदेशात दर्जेदार लोकर उत्पादित करणाऱ्या मेंढ्या आढळतात.
  • जगातील दर्जेदार बकऱ्या मुबलक संख्येत
  • हिम चित्ता (Snow Leopard) हा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी येथे अधिवास करतो.
  • या विभागाच्या पश्चिमेकडील प्रदेशात माळढोक (Great Indian Bustard) पक्षी आढळतो.
(2) हिमालयीन विभाग:
➤ भारतातील विपुल जैव विविधता वितरण असणाऱ्या पर्वतीय
➤ प्रदेशांपैकी हिमालय हा एक आहे. अनेक राष्ट्रीय उद्यानेही याच विभागात वसलेली आहेत.
➤ हिमालय हा अनेक जैवभौगोलिक विभागांच्या सीमांवर बसलेला असल्यामुळेच तेथील जैव विविधता वितरण ही विपुल आहे.
(3) वाळवंट विभागः हे परिक्षेत्र राजस्थान या राज्यात आहे.
(4) निम-शुष्क विभागः
➤ हे परिक्षेत्र राजस्थानमध्ये सुरू होऊन पंजाब आणि हरियाना या राज्यांमध्येही विस्तारलेले आहे.
➤ या प्रदेशात आढळणारे प्राणीजीवनही अत्यल्प आणि विशिष्ट असे आहे. ऑर्किड, बाबू आणि इतर काही वनस्पतींच्या प्रजातीही मर्यादित प्रमाणात येथे आढळतात .
➤ भूजल व भूपृष्ठजलाची पातळी अत्यंत कमी असणाऱ्या या प्रदेशात शुष्क प्रदेशीय वनस्पती (Xerophytic plants) सापडतात.

(5) पश्चिम घाटः
➤ भारतीय द्विपकल्पाच्या पश्चिम भागात स्थित असणारा हा पर्वतीय प्रदेश जैवविविधतेने संपन्न आहे.
➤ महाराष्ट्राच्या कोकण विभागापासून केरळच्या पश्चिम भागापर्यंत म्हणजेच मलबार किनारपट्टीपर्यंत हे परिक्षेत्र विस्तारलेले आहे.
प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती या प्रदेशात सापडतात.
➤ लागवडीखाली असणाऱ्या केळी, आबा, संत्री,काळीमिरी इत्यादींसारख्या असणाऱ्या वनस्पतींच्या वन्य उपप्रजाती या प्रदेशात आढळतात.
(6) दख्खनचे पठारः
➤दक्षिण भारताचा मुख्य भूभाग असणाऱ्या या प्रदेशात वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजाती त्याबरोबरच भारतामध्ये चार जैव विविधता वितरण हॉटस्पॉट्स वसलेले आहेत.
➤भारतामधील अनेक प्रजाती धोकाग्रस्त बनलेल्या असून आढळतात.
➤ मात्र काही प्रदेशात निम-शुष्क वृक्ष-वनस्पतीजीवनही आहे.
➤पाऊस हा मुख्यत: मान्सून वाऱ्यांपासून मिळत असल्याने घनदाट जंगले मर्यादित आहेत.
➤दख्खनचे पठार हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाड़,केरळ या राज्यांत पसरलेले आहे.
(7) गंगेची मैदाने विभाग
(8) ईशान्य भारत विभाग
(9) किनारपट्टी विभाग
(10) भारतीय किनाऱ्याजवळ असणारी बेटे

IUCN ची तांबडी यादी (Red List)


➤ इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झव्र्हेशन ऑफ नेचर (IUCN) या निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत RED असणाऱ्या जागतिक संघटनेने 1963 मध्ये ही यादी पहिल्यांदाच प्रसिद्ध केली.
➤ वन्यजीव प्रजातींच्याLIST संवर्धनासाठी होत असलेल्या जागतिक प्रयत्नांची स्थिती व यशापयश ही यादी दर्शविते.
➤ विविध देशांमधील वन्यजीव प्रजाती नामशेष होण्याच्या धोकापातळीचे (Risk of extinction) मूल्यांकन या यादीत केले जाते.
➤ IUCN ने निश्चित केलेल्या काही निकषांवर हे मूल्यांकन आधारलेले आहे.
➤ गुलाबी पृष्ठे: संकटग्रस्त प्रजाती, हरित पृष्ठे: पूर्वी संकटग्रस्त असणाऱ्या परंतु संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे या धोक्यामधून बाहेरपडलेल्या प्रजाती.
➤ दुर्दैवाने दिवसेंदिवस गुलाबी पृष्ठांची संख्या सतत वाढते आहे. संख्येने अत्यंत कमी असणारी हरित पृष्ठेदुबळ्या आणि अपुऱ्या संवर्धन उपाययोजनांचेच दर्शक आहे.

Indian Endangered Animals


अत्यंत संकटग्रस्त प्राणी
Animal Name Distribution
Slender Lories India
Hoolock Gibbon India
Golden Langur India
Lion Tail Macaque India


Indian Critically Endangered Animals


Animal Name Distribution
Lessar One Rhino India
Kashmir Hangul India
Pigmy Hog India
Malbar Civet India

Indian Vulnerable Animals


संवेदनशील
Animal Name Distribution
Black Monkey India
Slow Loris India
Asion Lion India
Clouded Leopard India

Indian Least Concern Animals


Animal Name Distribution
Hanuman Langur India
Himalayin Bear India
Chital India
Ibex India

Indian No Threatened Animals


Animal Name Distribution
Wild Ass India
BlackBuck India
Tibetian Black Ass India
Download MPSC Books pdf