https://www.dompsc.com



महत्वाच्या परिसंस्था|MPSC Environment(पर्यावरण) Notes

महत्वाच्या परिसंस्था|MPSC Environment(पर्यावरण) Notes


✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪

महत्वाच्या परिसंस्था

Author

By Shubham Vyawahare

-3-December-2024
➤या प्रकरणात पर्यावरणदृष्ट्या काही संवेदनशील आणि महत्त्वाच्या परिसंस्थांचा परामर्श आपण घेणार आहोत.
➤पृथ्वी वर अश्या अनेक संस्था आहेत ज्या सामान्य लोकाना ज्ञात नसतात.
➤अश्या परिसंस्था चा प्रभाव अनेक गोष्टीवर असू शकतो.
➤ याच प्रभावाचा परिणाम आपल्या पर्यावरनात दिसून येतो.

Wetlands(दलदलीय प्रदेश) आणि त्याचे महत्व


➤ दलदली परिसंस्था रचना आणि कार्ये या दोहोंच्या बाबतीत विविधता संपन्नआहेत.
➤ दलदली प्रदेश हे जमीन आणि पाणी यांमधील संक्रमणात्मक प्रदेश म्हणजे इकोटोन) असतात.
➤या दोहोंच्या काही वैशिष्ट्यांबरोबरच या परिसंस्थांची स्वत:ची अशी काही वैशिष्ट्ये असतात.
➤या प्रदेशांमध्ये विविध जलीय वनस्पतींनी व्यापलेले कायमस्वरूपी किंवा हंगामी उथळ जलसाठे आढळतात
➤दलदली प्रदेश जगभरात आढळणारी जलचर पर्यावरणातील प्रणाली आहेत.
➤ दलदली प्रदेश हा भूमीचा एक भाग आहे जो कायमस्वरुपी किंवा हंगामी पाण्याने भरला जातो.
➤ दलदली प्रदेश मध्ये ताजे पाणी, खारट (अंशतः खारट) किंवा खारट (खूप खारट) असू शकतात.
➤ दलदली प्रदेश नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकतात.
➤ पृथ्वीवरील अंटार्क्टिका हा एकमेव खंड ज्यामध्ये नैसर्गिक दलदली प्रदेश नाही .
➤ शहरी भागात पाण्याची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने मानवी निर्मित दलदली प्रदेश तयार केला जाऊ शकते
➤ दलदली प्रदेश भागात राहणारी वनस्पती ओल्या, उत्पादक मातीत बर्‍यापैकी सहनशील असणे आवश्यक आहे.
➤ प्रमुख वनस्पतीजीवन, पाण्याचा स्त्रोत आणि पीटची उपलब्धता या तीन निकषांच्या आधारे दलदली प्रदेशांचे खालील प्रकारे वर्गीकरण करता येते.
(1) मार्शेस (Marshes)
➤ या प्रदेशांत प्रामुख्याने पाण्याबाहेर डोकावणाऱ्या जलीय वनस्पती आढळतात.
➤ मार्श ओले जमीन आहेत जी सामान्यत: कायमस्वरूपी संतृप्त असतात आणि ते खारट किंवा गोड पाणी असू शकतात.
➤ समुद्राच्या किनारपट्टीवर समुद्राची भरतीओहोटी उद्भवते आणि भरती बदलण्यामुळे त्याचा परिणाम होतो, तर ज्वारीय दलदल ओढ्यांसह होते.
➤ भरतीसंबंधी दलदलीचा भाग बर्‍याचदा खारट किंवा खारट असतो आणि या प्रकारच्या ओल्या वाळवंटात आढळणारी वनस्पती ओल्या आणि खारट अशा दोन्ही परिस्थितींमध्ये जुळवून घेतात.
(2) स्वम्पी भूभाग (Swampy lands)
➤ यामध्ये प्रामुख्याने वृक्ष आढळतात.
➤ हे ताजे पाण्याचे आर्द्र प्रदेश आहेत ज्यावर वृक्षाच्छादित वनस्पती असतात.
➤ तेथे पुष्कळ प्रकारचे दलदलीचे प्रकार आहेत आणि ते प्रवाह व नदीच्या नद्यामधून गोड्या पाण्याने भरले आहेत
(3) अॅसिडीक बॉग्ज (Acidic bogs)
➤ या प्रदेशांत थोड्या वनस्पती प्रजातींसह जैवविविधता ही कमी असते. मात्र स्कॅनम ही पीट मॉस मुबलक प्रमाणात आढळते.
(4) फेम्स (Fems)
➤ यामध्ये मॉस (Moss) आणि इतर जलीय वनस्पतींच्या विविध प्रजाती आढळतात.

या दलदली प्रदेशांचा त्यांच्या प्राथमिक उत्पादकतेनुसार (Primary Productivity) असणारा क्रम: मार्शेस > स्वम्पी भूभाग > फेम्स > बॉग्ज


➤या परिसंस्था च पूर्ण अभ्यास झालेला नाही याचे एक मुख्य कारण म्हणजे इतर जलीय परिसंस्थांच्या तुलनेत भौतिक आणि रासायनिकदृष्ट्या हे प्रदेश अधिक असमान आहेत
➤पाणथळ प्रदेश ठरविण्यासाठी खालील तीन घटक महत्त्वाचे ठरतात.
  1. प्रदेश कायमस्वरुपी किंवा आवर्तपणे पाण्याखाली जाणे.
  2. जलीय वनस्पतींचे (Hydrophytic vegetation) अस्तित्व दलदली परिसंस्थांच्या संवर्धनाचे महत्त्व.
  3. जलसंपृक्त मृदा (Hydric soils). त्यामुळे मृदेचे वरचे थर विनॅक्सी (Anaerobic) बनतात.
➤ दलदली परिसंस्था या आर्थिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाच्या असून अनेकांच्या उपजीविकेशी संबंधित आहेत.
➤ विविध बुरशी,वनस्पती, वृक्षे आणि जलीय प्राण्यांचा अधिवास असणाऱ्या या परिसंस्थांची उत्पादकता खूप जास्त आहे.
➤ स्थलांतर करणाऱ्या 800 पक्षी प्रजातींपैकी 50% पेक्षा जास्त दलदली परिसंस्थांवर अवलंबून आहेत. ➤ अन्नाची उपलब्धता, वनस्पतींचे आच्छादन आणि भूस्थित भक्षकांपासून अलिप्तता (संरक्षण) या कारणांमुळे हे प्रदेश पाणपक्षांसाठी (Waterfowl like birds) उत्तम निवासस्थान आहेत.
➤ दलदली प्रदेश हे जमीन आणि पाणी यांदरम्यान गाळ (Sediments) आणि पोषणद्रव्ये (Nutrients) यांचे शोषण करणाऱ्या स्पाँजप्रमाणे नैसर्गिक बफर' म्हणून कार्य करतात.
➤सौंदर्यात्मकदृष्ट्या दलदलीय परिसंस्था या अमूल्य आहेत.मात्र अनियंत्रित वापरामुळे आणि मानवी हस्तक्षेपांमुळे या परिसंस्थांची अतोनात हानी मानवाकडून होत आहे.
➤ अनेक ठिकाणी(उदा. नवी मुंबई) भराव टाकून विविध मानवी वापरांसाठी या परिसंस्था नष्ट केल्या जात आहेत. जगातील एक जैवविविधता संपन्नअसणाऱ्या या परिसंस्थांचे संवर्धन करणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत निकडीचे आहे.
➤संवर्धन साठी केलेले काही करार

Ramsar Convention काय होते?


➤इराणमध्ये कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावरील रामसर या शहरात 2 फेब्रुवारी 1971 मध्ये हाआंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला.
➤यामुळेच 2 फेब्रुवारीहा जागतिक पाणथळी दिवस' (Wetlands day) Ramsar म्हणून साजरा केला जातो.
➤या कराराचे अधिकृत मूळ नाव 'Convention on Wetlands of International Importance especially Waterfowl Habitat' असे आहे.
➤ पाणपक्षांचा (Waterfowl birds) अधिवास म्हणून दलदली परिसंस्थांचे संवर्धन आणि धोरणी वापर (wise use) ही दोन कराराची उदिष्ट्ये असल्याचे हे नाव सुचविते.
➤ 1971 मध्ये स्वीकारण्यात आलेला हा करार 1975 मध्ये अंमलात आला.
➤ आज या करारात जगाच्या सर्व भागांतील 160 सदस्य राष्ट्रे सहभागी आहेत.
➤ 'रामसर यादी' (Ramsar List) (जागतिक महत्व असणाऱ्या दलदली प्रदेशांची यादी) हा या कराराचा सर्वात प्रमुख भाग आहे.
➤ जवळपास 168 सदस्य राष्ट्रांनी 208 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या 2186 दलदली प्रदेशांचा ‘रामसर क्षेत्रे' (Ramsar Sites) म्हणून या यादीत समावेश केला आहे.
➤ फ्रान्स, जर्मनी, स्पेन व स्वित्झर्लंड या चारही राष्ट्रांच्या एकत्रित क्षेत्रफळापेक्षाही जास्त हे क्षेत्र आहे.
➤ सर्वाधिक रामसर क्षेत्रे युकेमध्ये (170) तर त्यानंतर मेक्सिकोमध्ये (142) आढळतात.
➤ युनेस्को (UNESCO) रामसर करारासाठी पेढी (Depositary) म्हणून कार्य करते.
➤ मात्र हा करार युनेस्कोच्या पर्यावरणविषय करार व्यवस्थेचा भाग नाही.
➤ भारत हा देखील या कराराचा सदस्य आहे.
➤ भारताचे नेतृव तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गाँधी यांनी केले होते.

कराराचे तीन प्रमुख आधारस्तंभ

  1. धोरणी वापर (Wise use): दलदली परिसंस्थांची हानी होणार नाही याची संपूर्ण काळजी घेऊन येथील ससाधनाचाधोरणी वापर (Wise use) करणे.'
  2. रामसर यादीः संवेदनशील आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या दलदली प्रदेशांचा शोध घेऊन, त्यांचा रामसर यादीतसमावेश करण्याबरोबरच त्यांचे प्रभावी आणि शाश्वत व्यवस्थापन.
  3. आंतरराष्ट्रीय सहकार्य: या परिसंस्थांच्या धोरणी वापर आणि संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य.
✪ भारतातील रामसर क्षेत्रे ✪

Matrix Record आणि त्याची महिती


➤ तांत्रिक प्रगती, प्रदूषण किंवा मानवी हस्तक्षेपामुळे ज्यांच्या परिस्थितिकीय स्वरूपामध्ये (Ecological Character) बदल झालेलेआहेत किंवा नजीकच्या काळात होण्याची शक्यता आहे, अशा जागतिक महत्वाच्या दलदलीय परिसंस्थांचा या 'रेकॉर्ड'मध्ये समावेश केला जातो.
➤ 'रामसर यादी' चा एक भाग म्हणूनच (माँट्रिक्स रेकॉर्ड' राखले जाते.
➤ही स्वतंत्र यादी नाही.
➤रामसर यादीतील एकूण 2186 रामसर क्षेत्रांपैकी 48 रामसर क्षेत्रांचा समावेश माँट्रिक्स रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे.
➤'माँट्रिक्स नोंदी' मधील भारतीय रामसर क्षेत्रे (केवळ दोन) - (1) केवलादेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान (2) लोकटक सरोवर, मणिपूर
➤ बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी आणि नाशिक जिल्ह्यातील नांदुर-मधमेश्वर या तीन जलाशयांचा समावेश रामसर यादी मध्ये करण्यासाठी राज्यशासनातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत.
➤ या तीन पाणवठ्यांचा निर्णय झाल्यानंतर भविष्यात पुणे व सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील उजनी धरण आणि मुंबईजवळील शिवडी या पाणथळींचाही प्रस्ताव राज्यातर्फे पाठविण्यात येणार आहे
राष्ट्रीय पाणथळ प्रदेश संवर्धन कार्यक्रम
1985-86 मध्ये सुरु केलेल्या या कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे:
  1. पाणथळ परिसंस्थांमधील संसाधनांचे मूल्यमापन करणे.
  2. राष्ट्रीय महत्त्व असणारे पाणथळ प्रदेश ठरविणे.
  3. संशोधन आणि विकासाला (R & D) प्रोत्साहन देणे.
  4. ठराविक पाणथळ प्रदेशांच्या (सध्या 13 राज्यांतील 20 पाणथळ प्रदेश) व्यवस्थापन कृती योजनांची (Management Action Plans) अंमलबजावणी मंत्रालयाने या कार्यक्रमांतर्गत तातडीने संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी 115 पाणथळ प्रदेशांची निवड केलेली आहे.
  5. या कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण व हद्द आखणी, Catchment area, उपचार, गाळ उपसणी, तण नियंत्रण, मत्स्य विकास, लोकसहभाग, जल व्यवस्थापन, जनजागृती, प्रदूषण नियंत्रण इ. सारखे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

खारफुटीची वने (Mangroves) आणि त्याचे महत्व


➤ खारफुटीची वने ही माशेस, टायडल क्रिक्स, खाड्या इत्यादींच्या किनाऱ्यावर आढळतात.
➤या वनांमध्ये क्षार-सहनशीलोअसणाऱ्या विविध वनस्पती प्रजाती आढळतात.
➤असंख्य पक्षी प्रजातीदेखील या वनांमध्ये अधिवास करतात.
➤म्हणूनच ही वने जैवविविधता संपन्न असतात.
➤जगातील ३% वने ही भारतात आहेत.
➤2015 नुसार भारतातील या वनांचे क्षेत्र 4,740 चौ.किमी. (भारतातील एकूण क्षेत्रफळाच्या 0.14%) एवढे आहे.
➤ विशेषतः अंदमान-निकोबार बेटे आणि पश्चिम बंगाल मधील सुंदरबन येथील खारफुटीची वने ही अत्यंत विकसित आहेत.
➤ केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने 28 खारफुटी वनक्षेत्रे आणि 4 प्रवाळ क्षेत्रांची संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी निवड केली आहे.
➤ भारतातील खारफुटी वनांचे सर्वांत जास्त क्षेत्र पश्चिम बंगाल या राज्यात व त्यानंतर अनुक्रमे गुजरात, अंदमान आणि निकोबार बेटसमूहांवर आढळते.
2006 चे खारफुटीची वने संबंधित राष्ट्रीय धोरण
ही वने उपयुक्त असतात कारण
  1. विविध सागरी प्रजातींना अधिवास पुरवितात.
  2. अत्यंत प्रतिकूल हवामानापासून (उदा. त्सुनामी वादळे) संरक्षण देतात.
  3. शाश्वत पर्यटनासाठी महत्त्वाची साधनसंपत्ती आहेत.
✪ या वनांवरही मानवाचे अतिक्रमण आणि हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळेच पर्यावरण संतुलनासाठी त्यांचे संवर्धन होणे गरजे आहे. या वनांच्या संवर्धनाच्या उद्देशाने त्यांचे वर्गीकरण सीआरझेड-I (Coastal Regulation Zone -I) मध्ये केलेले आहे. खारफुटी वनांपासून मिळणारे फायदे
➤ ही वने जैवविविधता संपन्न आहेत. जवळपास 2000 मासे आणि अपृष्ठवंशीय प्राण्यांना ही वने अधिवास पुरवितात.
➤ कोळंबी आणि अनेक मत्स्य प्रजातींची ही पोषण (Feeding) आणि प्रजनन (Breeding) स्थाने आहेत.
➤ समुद्राचे जमिनीवरील आक्रमण थोपवून किनारपट्टी स्थिरीकरणाचे कार्य करतात.
➤ नद्यांनी व इतर जलप्रवाहांनी वाहून आणलेला गाळ अडवितात..

कचरा आणि प्रदूषकांना फिल्टर (गाळणी) म्हणून प्रभावी ठरतात.


➤ सागरी उत्पादकतेत महत्वाचा वाटा.
➤वादळांपासून आणि सुनामी लाटांपासून किनारपट्टीचे संरक्षण.


राष्ट्रीय खारफुटी वने जनुकिय संसाधन केंद्र (National Mangrove Genetic Resource Centre) ओडिशा मधील भितरकनिका येथे स्थापन करण्यात आले आहे.
खारफुटी वने धोक्यात येण्याची कारणे
  1. लाकूड, चारा, इंधन इत्यादींसाठी वनांचे अतिशोषण
  2. भूभागामध्ये रूपांतर
  3. शेतजमीनीमध्ये रूपांतर
  4. शहरीकरण व विकासप्रकल्प
  5. पर्यटन विकासाची कामे
  6. कचरा टाकण्यासाठी वापर
  7. कृषिरसायनांनी केलेले प्रदूषण
  8. खाणकाम (mining)
  9. अतिरिक्त जंगलतोडीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेली मृदेची धूप आणि त्यामुळे खारफुटी वनांमध्ये साठलेला अतिरिक्त गाळ
खारफुटी वने संवर्धन
भारतामध्ये 1987 मध्ये खालील दोन कार्यक्रम हाती घेण्यात आले.
(1) दलदली प्रदेश (Wetlands) संवर्धन कार्यक्रम
(2) खारफुटी वने (Mangroves) संवर्धन कार्यक्रम


Coral Reefs प्रवाल भित्तीका आणि त्याचे महत्व


➤प्रवाळे (Coral Reefs) म्हणजे सागरी पाण्याखालील विशिष्ट परिस्थितीमध्ये वाढणाऱ्या सिलेंटराटा (Phylum Coelenterata)या वर्गातील (Class Anthozoa) लहान आकाराच्या कोरलप्राण्यांच्या वसाहती होय.
➤ या प्राण्यांनी स्त्रवलेल्या कॅल्शियम कार्बोनेट अति मृत प्रवाळ प्राण्यांच्या शरीरांपासून प्रवाळ भित्तिका तयार होतात.
➤ कोरल रिफमधील केवळ वरच्या थरातील (कोरल्सच्या पृष्ठभागाजवळील) कोरल प्राणी जिवंत असतात.
➤ बाकी सर्व थरांतील प्राणी हे वरच्या थरांतील प्राण्यांनी स्त्रवलेल्या कॅल्शियम कार्बोनेटमध्ये बुडालेले व मृत झालेले असतात.
प्रवाळ वाढीसाठी आवश्यक असणारी विशिष्ट परिस्थिती
➤(1) तापमानः प्रवाळवाढीसाठी सागरी पाण्याचे तापमान सामान्यत: 16-35°C असावे लागते. मात्र 23-25°C हे तापमान प्रवाळवाढीसाठी अधिक उपयुक्त किंवा अनुकूल (Optimum Temp.) असते.
➤(2) स्वच्छ पाणी : गाळ आणि गोडे पाणी समुद्रात आणणाऱ्या नद्यांचा अभाव, ही प्रवाळांच्या वाढीसाठी आवश्यक पूर्व-परिस्थिती आहे. अतिरिक्त गाळामुळे पाण्यातील सूर्यप्रकाशाची उपलब्धता कमी होते. त्यामुळे प्रवाळांच्या उतींमध्येआढळणाऱ्या प्रोटोझोआ गटातील Zooxanthellae (शैवालसम जीव) या परस्परसहयोगी सजीवांमधील (Symbioticalgae like Protozoan called Zooxanthellae) प्रकाशसंश्लेषण क्रिया थांबते किंवा मंदावते. प्रवाळ प्राण्यांच्या मुखामध्ये गाळ अडकून त्यांच्या पोषणावर विपरीत परिणाम होण्याचा धोकाही अधिक असतो.
प्रवाळ भित्तिकांचे महत्त्वाचे तीन प्रकार खालीलप्रमाणे दिलेले आहेत.
(1) बॅरियर भित्तिका (Barrier Reef): प्रवाळ भित्तिका बेटाभोवती कंकणाप्रमाणे भासतात. प्रवाळ भित्तिका आणि बेट यांदरम्यान खाजण निर्माण होते. बेटापासून काही अंतरावर प्रवाळ भित्तिका निर्माण होतात.
(2) फ्रीजिंग भित्तिका (Fringing Reef): या प्रकारच्या प्रवाळभित्तिका बेटास लागूनच तयार होतात. त्यामुळे खाजणाची निर्मिती होत नाही.
(3) ॲटॉल भित्तिका (Atoll Reef): पाण्याखाली बुडालेल्या बेटावर या प्रवाळ भित्तिका निर्माण होतात. या कंकणाकृती किंवा अर्धचंद्राकृती भासतात. लक्षद्विपप्रमाणे प्रवाळ बेटांची निर्मिती होते.




Download MPSC Books pdf