https://www.dompsc.com



पारिस्थितिय अनुक्रमण|MPSC Environment(पर्यावरण) Notes

पारिस्थितिय अनुक्रमण|MPSC Environment(पर्यावरण) Notes


✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪

पारिस्थितिय अनुक्रमण म्हणजे काय

Author

By Shubham Vyawahare

6-November-2024
➤कुठलीच परिसंस्था ही कायमस्वरूपी स्थिर राहत नाही. कालानुरूप व वातावरणातील बदलांप्रमाणे तित बदल हे अपरिहार्य असतात.
➤ काळाच्या ओघात परिसंस्थेत /जीवसमुदायात पर्यावरणातील बदलांप्रमाणे बदल घडून, परिसंस्थेस/जीवसमुदायास स्थैर्य प्राप्त होण्याच्या प्रक्रियेस परिस्थितिकीय अनुक्रमण असे म्हणतात."
➤पृथ्वीवरील विविध परिसंस्थांची आज दिसणारी संरचना आणि स्वरूप हे काही शेकडो किंवा हजारो वर्षांपूर्वी वेगळेच होते.
➤ आज दिसणाऱ्या काही वनांच्या जागी पूर्वी तलाव परिसंस्था (Lake Ecosystems) होत्या
➤ परिसंस्थांचे आपणास दिसणारे आजचे स्वरूप हे या कालावधीत टप्प्याटप्प्याने घडलेल्या परिस्थितिकीय अनुक्रमण' या प्रक्रियेचाच परिणाम आहे.

प्राथमिक अनुक्रमण


➤ ज्या प्रदेशात किंवा अधिवासामध्ये सजीवांचे पूर्वी कधीही अस्तित्व नव्हते, अशा उजाड प्रदेशात सजीवसृष्टी नव्याने निर्माण होऊन, त्यात कालानुरूप बदल घडण्याच्या प्रक्रियेस प्राथमिक अनुक्रमण म्हणतात.
➤ अपघाताने किंवा वाढलेल्या स्पर्धेमुळे इतर अधिवासांतून काही सजीव स्पर्धा नसलेल्या अशा उजाड प्रदेशात (Bare land) स्थलांतर करतात.
➤ हा उजाड प्रदेश व्यापणाऱ्या सर्वात पहिल्या प्रजातीस (प्रणेती प्रजाती (Pioneer Species) असे संबोधतात.
➤ उदा. नव्याने निर्माण झालेल्या बेटावर सजीवसृष्टीचे अस्तित्व निर्माण होऊन जीवसमुदाय आकारास येणे



द्वितीयक अनुक्रमण (Secondary Succession)


➤ज्या प्रदेशातील सजीवांचे अस्तित्व काही कारणांनी (उदा. वणवा, जंगलतोड, अतिरिक्त चराई, मानवी हस्तक्षेप इ.) नष्ट होऊन तो प्रदेश उजाड बनला असेल, त्यात पुन्हा सजीवसृष्टीस सुरुवात होऊन त्यात कालांतराने बदल घडत राहण्याच्या प्रक्रियेला द्वितीयक अनुक्रमण म्हणतात.
➤उदा. वणव्यांनी.

पारिस्थितिय अनुक्रमणाची प्रक्रिया


➤ काळाच्या ओघात जीवसमुदायाच्या संरचनेत बदल होत जातात. जीवसमुदायातील एका प्रजाताची जागा दुसरी प्रजाती घेते..
➤अनेक कारणांनी कुठल्याही परिसंस्थेतील पर्यावरणामध्ये बदल घडत असतात. बऱ्याचदा या बदलांना त्या परिसस्थतीलजीवसमुदायच कारणीभूत असतो.
➤ या बदलांप्रमाणे तेथील जीवसमुदायाची संरचना (Community Structure) देखील बदलत जाते.सजीवांच्या एका प्रजातीची जागा कालांतराने बदललेल्या पर्यावरणाशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेणारी दुसरी प्रजाती घेते.

परिस्थितिकीय अनुक्रमणाची प्रक्रिया


स्थापना (Establishment)-प्रणेत्या प्रजातीची स्थापना आणि वाढ आणि इतर प्रजातींचे त्या प्रदेशात स्थलांतर आणि वाढ (Aggregation).
स्पर्धा (Competition)-जीवप्रजातींची संख्या वाढून स्पर्धा निर्माण होते.
प्रतिक्रिया (Reaction)-हे सजीव पर्यावरणावर प्रभाव टाकून त्यात बदल घडवून आणतात. नैसर्गिकपणे पर्यावरणात घडणाऱ्या बदलांमुळे आणि सजीवांनी घडवून आणलेल्या बदलांमुळे कालानुरूप जीवसमुदायाच्या रचनेत बदल होत जातात.
स्थिरीकरण (Stabilization)-(क्लायमॅक्स टप्पा)परंतु एक टप्पा असा येतो की, जीवसमुदायाचा तेथील पर्यावरणाशी समतोल बनून तो जीवसमुदाय/परिसंस्था जास्त काळासाठी स्थिर राहते. या टप्प्यास 'क्लायमॅक्स टप्पा' किंवा 'स्थिरीकरणाचा टप्पा' म्हणतात. आजच्या जगातील अनेक स्थिर परिसंस्था क्लायमॅक्स मध्ये आहेत..




Download MPSC Books pdf