https://www.dompsc.com



किंमतवाढ(Inflation) कशी होत असते आणि ती कशी मोजतात-MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes PDF

किंमतवाढ(Inflation) कशी होत असते आणि टी कशी मोजतात-MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes PDF


✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪

किंमतवाढ(Inflation) म्हणजे काय?


➤ एका विशिष्ट वेळी चलनाची खरेदी शक्ति कमी होने म्हणजे चलनवाढ.
➤ यालाच किंमतवाढ ,चलनविस्तार,भाववाढ असे म्हणतात.
➤ भाववाढ जर कमी वेळ असेल तर ती भाववाढ नसते.

किंमतवाढ मोजमाप पद्धति

Author

By Shubham Vyawahare

-3-December-2024

घाउक किंमत निर्देशांक (Wholesale Price Index-WPI )


➤ WPI दर महिन्याला काढतात.
➤ इंधन व प्राथमिक वस्तु चा दर आठवड्याला काढतात.
➤ WPI चे आधारभूत वर्ष २००४-२००५ आहे.
➤ WPI मध्ये ६७६ वस्तु विचारात घेतात.

ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer Price Index-CPI )


➤ सद्याचे ग्राहक किंमत निर्देशांक देशाच्या संपूर्ण लोकसंख्येला सामावून घेत नसल्याने देशातील किंमतींच्या प्रवृत्तीचे पूर्ण चित्र नवीन ग्राहक किंमत निर्देशांक नुसार काढले जाते ( CPI-New )
➤ किरकोळ किंमत वरून काढतात.
➤ २०१० हे वर्ष आधारभूत वर्ष स्विकारण्यात आले होते, मात्र जानेवारी २०१५ पासून २०१२ हे कॅलेंडर वर्ष आधारभूत वर्ष म्हणून स्विकारण्यात आले आहे.
➤ सेवा आणि वस्तु चा विचार होतो
➤ निर्देशांक पाच गटांसाठी उपलब्ध केले जातील-१)अन्न, पेये व तंबाखू २)इंधन व दिवाबत्ती ३)गृहनिर्माण४)वस्त्र, बेडिंग व चपला आणि ५)इतर.
  1. CPI-Urban :शहरी भागांचा ग्रा.किं.निर्देशांक काढण्यासाठी ३१० शहरांची निवड करण्यात आली असून तेथिल १११४ .जे जारांमधून सरासरी ४६० वस्तू व सेवांच्या किंमती दर महिन्याला जमा केल्या जातात.
  2. CPI-Rural:ग्रामीण भागांचा ग्रा.किं.निर्देशांक काढण्यासाठी११८१ गावांची निवड करण्यात आली असून तेथून सरासरी ४४८ वस्तू व सेवांच्या किंमती दर महिन्याला जमा केल्या जातात.
  3. वरील दोन्ही निर्देशांकाच्या साहाय्याने एकत्रित ग्राहक किंमत (CPI-Combined) काढला जाईल.



किंमतवाढ प्रकार


1)रांगणारी चलनवाढ (Creeping Inflation)


➤ भाव वाढीचा दर जर खूप कमी असेल तर (गोगलगाय किंवा वेलीच्या वाढीच्या दराप्रमाणे) त्यास रांगणारी भाववाढ असे म्हणतात.
➤ चलनवाढीचा वार्षिक दर सुमारे ३ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्यास रांगणारी चलनवाढ म्हणतात.

2)चालणारी चलनवाढ (Walking/Trotting Inflation):


➤ मुख्यतः तिचा वार्षिक दर ३ ते ७ टक्क्यांच्या दरम्यान असतो तेव्हा तिला चालणारी चलनवाढ असे म्हणतात.
➤ अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी ही चलनवाढ आवश्यक मानली जाते. मात्र, ती १० टक्क्यांपर्यत पोहचत असेल तर सरकारला ती आटोक्यात आणायला हवी असा संकेत असतो.

३)पळणारी चलनवाढ (Running/Galloping Inflation)


➤ जेव्हा किंमती मोठ्या दराने वाढतात (घोड्याच्या पळण्याच्या वेगाप्रमाणे) व चलनवाढीचा वार्षिक दर १०-२० टक्के असतो तेव्हा तिला पळणारी चलनवाढ म्हणतात.

४)बेसुमार चलनवाढ (Hyper/Runaway/Astronomical Inflation):

:
➤जेव्हा चलनवाढीचा दर २० ते १०० टक्के एवढा किंवा त्याहून अधिक असतो तेव्हा तिला बेसुमार चलनवाढ म्हणतात.

किंमतवाढीची कारने कोणीत आहेत?


१)मागणी-ताण निर्मित चलनवाढ


➤ चलनवाढीचा परंपरागत सिद्धांत सिद्धांत आहे, त्यांच्या मागणीचे प्रमाण वाढल्याने किंमतीमध्ये वाढ होते.
➤ केन्स व त्याच्या अनुयायांच्या मते वस्तू व सेवांच्या अतिरिक्त मागणीमुळेच किंमती वाढतात

2) खर्च-दाब निर्मित चलनवाढ


➤ खर्च-दाब निर्मित चलनवाढीचे मूलभूत कारण म्हणजे कामगारांच्या उत्पादकतेपेक्षा त्यांच्या मजुरीमध्ये अधिक वेगाने होणारी वाढ होय
➤ ज्या देशांमध्ये कामगार संघटना (Trade खर्च- Unions) प्रभावी असतात.
➤ त्या देशांमध्ये ही चलनवाढ आढळून येतो.
➤ मालकांवर दबाव टाकून ते आपल्या मजुरीमध्ये मात्र :वाढ करून घेण्यात यशस्वी होत असतात.






Download MPSC Books pdf