https://www.dompsc.com



अर्थशास्त्र मुलभुत संकल्पना-mpsc Economics(अर्थशास्त्र)

अर्थशास्त्र मुलभुत संकल्पना-mpsc Economics(अर्थशास्त्र)|dompsc


✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪

Intro of अर्थशास्त्र मुलभुत संकल्पना

Author

By Shubham Vyawahare

4-September-2024
➤अर्थशास्त्रात मानवी वर्तनाच्या आर्थिक बाजूंची चर्चा केली जाते.
➤ अर्थशास्त्राला १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात, स्वतंत्र शास्त्र' म्हणून स्थान मिळाले स्वतःचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी मनुष्य जे आर्थिक व्यवहार करतो त्या आर्थक व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो.
➤आधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे असले तरी उत्पादन (production), विभाजन (distribution), विनिमय (exchange) आणि उपभोग (consumption) या चार प्रकारच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार से म्हटले जाते.
➤ म्हणूनच या चार.व्यवहारांशी संबंधित असलेल्या संस्था, संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला अर्थव्यवस्था' (economy) असे म्हणतात.
➤ आपण एखाद्या गावाच्या, शहराच्या, जिल्ह्याच्या राज्याच्या, देशाच्या, तसेच संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची कल्पना करू शकतो.
➤ भारतीय संस्कृति मध्ये अर्थशास्त्र ची पाळमुले अत्यंत प्राचीन कालखंडात रोवलेली आढळतात.
➤ चन्द्रगुप्त कालीन चाणक्य ची अर्थनीति ही आजही जग प्रसिद्ध आहे.
➤ सम्पूर्ण जगाचे अर्थचक्र हे फ़क्त मागणी आणि पुरवठा याच दोन गोष्टीवर अवलंबून असते.
➤वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या अर्थव्यवस्था दिसतात ,वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या अर्थव्यवस्था दिसतात ऐतिहासिक, राजकीय वातावरणातून कार्यपद्धतीत फरक निर्माण होतो.
➤ तसेच अर्थव्यवस्थामध्ये कालीकदृष्ट्या सुद्धा बदल होत जातात.

अर्थव्यवस्था प्रकार -उत्पादक साधना नुसार मालकी


➤ भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता यांना उत्पादनाची साधने असे म्हटले जाते.
➤ही साधने नेमकी कुणाच्या मालकीची आहेत यावर अर्थव्यवस्था विभागली जाते

1) भांडवलशाही अर्थव्यवस्था (Capitalistic Economy)


➤ ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजारयंत्रणे करवी ठरतात, अशा अर्थव्यवस्थेला 'भांडवलशाही अर्थव्यवस्था' असे म्हणतात.

✪भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये ✪


  1. उत्पादनाच्या साधनांचा खाजगी मालकी हक्क हे भांडवलशाहीचे मूलभूत वैशिष्ट्य आहे.
  2. उद्योग-व्यवसायाची निवड व त्यांची उभारणी यांसंबंधीचे निर्णय त्यावरून , मालक स्वतः स्वतंत्रपणे घेऊ शकतात.
  3. ग्राहक हे 'सार्वभौम' असतात, कारण उत्पादक ग्राहकांच्या पसंतीनुसारच वस्तू व सेवांचे उत्पादन करतात.
  4. बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते.(कारण मागणी -पुरवठा तत्वावर बाजार अवलंबून असतो.
  5. किंमत ठरण्याची प्रक्रिया (pricing mechanism) मुक्तपणे म्हणजेच ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असते. म्हणून भांडवलशाहीला 'मुक्त अर्थव्यवस्था' (free economy) असे अर्थव्यवस्थांचे म्हणतात. तसेच तिला 'Leissez faire' (non-interven-tion) म्हणजे हस्तक्षेपविरहीत अर्थव्यवस्था' असेही म्हणतात.
  6. वस्तू व सेवांच्या किंमती बाजारात मागणी व अवस्थेनुसार आधारे ठरतात. म्हणून भांडवलशाहीला बाजार अर्थव्यवस्था(market economy) असेही म्हणतात.
  7. ही एक स्वयंचालित अर्थव्यवस्था आहे


समाजवादी अर्थव्यवस्था (Socialist Economy)


➤ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी/सार्वजनिक मालकीची असतात आणि वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सरकारमार्फत चालते, अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थ: अर्थव्यवस्था असे म्हणतात.

✪समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये ✪


➤उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व वापर समाजहितासाठी होतो.
➤वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. सर्व आर्थिक निर्णय सरकार घेत असल्याने मूलभूत गरजेच्या वस्तू सुरू सेवा कमीत कमी किंमतीत व योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो.
➤उत्पादनकार्य सरकारी यंत्रणेमार्फत होत असल्याने खाजगी भांडवलाला वाव नसतो
➤ चीन हा समाजवादी अर्थव्यवस्था चे उत्तम उदाहरन आहे .

मिश्र अर्थव्यवस्था (mixed Economy)


➤ मिश्र अर्थ्व्यवस्था ही भांडवल शाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे उत्तम उदाहह्रण आहे.
➤ या प्रकारच्या अर्थव्यवस्था मध्ये वस्तु व सेवांचे उत्पादन सरकार तसेच खाजगी क्षेत्रमार्फत होत असते.
➤ विशेषत: मालमत्तेची मालकी आणि वस्तू आणि सेवांची निवड करण्याचे आर्थिक स्वातंत्र्य.
➤खासगी उत्पादकांच्या मालकीची आणि अस्तित्वामुळे देखील भांडवलाची निर्मिती देशात वाढते.
➤ यामुळे अर्थव्यवस्था वेगाने आणि योग्य दिशेने वाढण्यास मदत होते.
➤ बाजारात निरोगी स्पर्धा असते .

✷ भारताचा प्रवास हा भांडवलशाही अर्थव्यवस्था कडून मिश्र अर्थव्यवस्था ते सध्या मुक्त अर्थव्यवस्थेकडे जाणारा आहे


अर्थव्यवस्था प्रकार -विकासा नुसार



विकसित अर्थव्यवस्था (Developed economy)
➤विकसित अर्थव्यवस्था मध्ये दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे मोठे प्रमाण,औद्योगिकीकरण व शहरीकरण, साक्षरतेचे सार्वजनिक क्षेत्र प्रमाण, घटता जन्मदर व मृत्यूदर इत्यादी लक्षणे आढळून येतात.
➤ यु.एस.ए., यु.के., जर्मनी, फ्रान्स, जपान, औस्ट्रेलिया इत्यादी देशांच्या अर्थव्यवस्था विकसित आहेत.
विकसनशील अर्थव्यवस्था (Developing economy)
➤विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये दरडोई उत्पन्नाचे अल्प प्रमाण, कमी औद्योगिकीकरण, कृषि क्षेत्राचे प्राबल्य, साक्षरतेचे कमी लोकसंख्या वाढीचा उच्च दर इत्यादी लक्षणे आढळून
➤ मात्र ही राष्ट्रे आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील शा असेही म्हटले जाते. सेवा क्षेत्रामध्ये व्यापार, वाहतूक, असतात. म्हणून त्यांना अविकसित किंवा अल्पविकसित दळणवळण, तसेच संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक, म्हणण्याऐवजी 'विकसनशील' किंवा 'विकासान्मुख' म्हणणे अधिक योग्य ठरते.

अर्थशास्त्र क्षेत्र-व्यवसाया नुसार


1) प्राथमिक क्षेत्र (Primary Sector)
➤ या क्षेत्रात नैसर्गिक साधनसामुग्रीशी संबंधित कृषि व संलग्न व्यवसाय (पशूसंवर्धन, मत्सव्यवसाय, रेशिम उत्पादन इ.), जंगलसंपत्ती, खाणी उत्खनन) इत्यादी उपक्रमांचा समावेश होतो
➤ प्राथमिक क्षेत्रास 'कृषि व संलग्न क्षेत्र' (Agriculture and Allied Sector)असेही संबोधले जाते.
२)द्वितीयक क्षेत्र (Secondary sector):
➤या क्षेत्रात प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूंवर प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात त्यामुळे या क्षेत्रास उद्योग क्षेत्र असेही संबोधले जाते.
➤ या क्षेत्रात कारखानदारी/विनिर्माण, बांधकाम, वीजनिर्मिती, पाणी पुरवठा इत्यादी व्यवसायांचा समावेश होतो.
३)तृतीयक क्षेत्र (Tertiary sector):
➤ या क्षेत्रामध्ये प्राथमिक द्वितीयक क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश होतो.
➤ त्यामुळे या क्षेत्राला 'सेवा क्षेत्र' (service sector) असे म्हणतात.
➤ सेवा क्षेत्रामध्ये व्यापार, वाहतूक, दळणवळण, तसेच संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक,सामाजिक यांबरोबरच विविध वैयक्तिक सेवांचाही समावेश होतो.
४)चतुर्थक क्षेत्र (Quaternary sector)
➤ या क्षेत्रात उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या व्यवसायांमध्ये करण्यात येतो त्यांचा समावेश होतो.
➤ असे व्यवसाय उच्च ज्ञानाशी संबंधित असून त्यांचा संबंध संकल्पनांची (ideas) निर्मिती, संशोधन व विकास यांच्याशी असतो.
➤ उदा. संशोधन व विकास (R&D), माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअरवा विकास इत्यादी.
५)पंचक क्षेत्र (Quinary sector)
➤ या क्षेत्रात समाजातील सर्व स्थारातिल उच्च निर्णय घेणार्या लोकांचा समावेश असतो
➤ त्यामध्ये सरकार, विज्ञान, विद्यापीठे, गैरसरकारी संस्था,आरोग्य सेवा, संस्कृती, प्रसार माध्यमे इत्यादी क्षेत्रातील उच्चस्तरीय कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा समावेश होतो.


अर्थशास्त्र क्षेत्र-मालकी नुसार


1) सार्वजनिक क्षेत्र:
➤ राष्ट्रीय क्षेत्र, राज्य किंवा प्रांतीय आणि स्थानिक सरकार यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या आर्थिक यंत्रणेचा सार्वजनिक भाग हा त्या भागाचा भाग आहे.
➤ विशिष्ट वस्तू आणि सेवा तयार करणे किंवा प्रदान करण्यात सार्वजनिक क्षेत्र खासगी क्षेत्रासह आच्छादित आहे.
2) खाजगी क्षेत्र:
➤ ज्या व्यवसायावर कुणा एका सरकार ची मालकी नसून एखाद्या व्यक्ति व समुहाची मालकी असते त्याला खाजगी क्षेत्र असे म्हणतात.
➤ व्ययक्तिक लाभ मिलवने हे या क्षेत्राचे उद्देश असते.
3) संयुक्त क्षेत्र:
➤ संयुक्त क्षेत्र मालकी सरकारची तसेच खाजगी असू शकते.
➤ यावर संयुक्तिक नियंत्रण असू शकते.
3) सहकार क्षेत्र:
➤ या क्षेत्रात सामूहिक मालकी असते .
➤ हा खाजगी क्षेत्राचा उपप्रकार आहे.
➤ एक सभासद एक तत्व या तत्वावर सहकार क्षेत्र चालते.






Download MPSC Books pdf