रोजगार(Employment)म्हणजे काय आणि भारतातील स्थिती-MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes PDF

✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪
Table Of Contain
रोजगार(employment) म्हणजे काय?
➤ उच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याद्वारे राष्ट्रीय उत्पादात भर घालणाऱ्या सर्व व्यक्तींना कामगार (worker) असे म्हणतात.
➤आजार, इजा, प्रतिकूल हवामान, सण, सामाजिक किंवा धार्मिक समारंभ अशा कोणत्याही कारणांमुळे कामाहून तात्पुरता गैरहजर राहणारा व्यक्तीसुद्धा कामगारच असतो.
कामगारांचे वर्गीकरण
- नियमित पगारदार/मजुरी कामगार (Regular Salaried/Wage Employees)
- किरकोळ मजुरी कामगार (Casual Wage Labour)
- स्वयं-रोजगारी (Self Employed)
रोजगार मोजमाप संबंधित संकल्पना
श्रम शक्ति
➤ काम करणारे किंवा कामाच्या शोधत असलेले व्यक्ति येतात.
➤ श्रम शक्ति = कामगार + बेरोजगार
कार्य शक्ती
➤ प्रत्यक्ष काम करणार्य व्यक्ती
➤ कार्य शक्ति =श्रम शक्ति - बेरोजगार
बेरोजगारी दर
➤(बेरोजगार / श्रम शक्ति ) * १०००
बेरोजगारी प्रमाण
➤(बेरोजगार / एकून लोकसंख्या ) * १०००
बेरोजगारी प्रकार कोणते?
➤ रोजगाराच्या शोधत असलेल्या पण काम प्राप्त न झालेल्या लोकाना बेरोजगार म्हणतात.
1) खुली बेरोजगारी (Open Unemployment)
➤काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे
2) हंगामी बेरोजगारी (Seasonal Unemployment)
➤शेतीचा नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या द्वारे संरक्षण केले इतर काळात भासणारी बेरोजगारी हे हंगामी बेरोजगारीचे उत्तम उदाहरन आहे.
३)अदृश्य/प्रच्छन्न बेरोजगारी (Disguised Unemployment)
➤उपक्रमांमध्ये आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून एखादे काम जेवढे व्यक्ती त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास ते जास्तीचे व्यक्ती अदृश्यपणे/प्रच्छन्नपणे बेरोजगार म्हणतात
४) सुशिक्षित बेरोजगारी (Educated Unemployment):
➤कार्यक्षमतेपेक्षा/शिक्षणाच्या दर्जापेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर काम करतात तेव्हा त्याला सुशिक्षित बेरोजगारी म्हणतात.
५) घर्षणात्मक बेरोजगारी (Frictional Unemployment)
➤ जेव्हा कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतिक्षेतऐच्छिकरीत्या बेरोजगार असतो. तेव्हा त्यास घर्षणात्मक बेरोजगारी म्हणतात
रोजगार मोजमापन कसे करतात ?<
➤ भारतात बेरोजगारीविषयक आकड्यांचे तीन प्रमुख स्त्रोत आहेत
- दशवार्षिक जनगणनेचे अहवाल
- राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेचे (NSSO) रोजगार बेरोजगारा बाबतचे अहवाल
- रोजगार व प्रशिक्षण सरसंचलनालय (DGET)
➤ NSSO ने असा पहिले सर्वक्षण आपल्या २७ व्या सर्वेक्षण फेरीमध्ये ऑक्टोबर १९७२- सप्टेंबर १९७३ या कालावधीसाठी केले होते
➤ NSSO सध्या रोजगार व बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी तीन प्रमुख पद्धतींचा वापर करते
नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा (Usual Principal and Sub- sidiary Status: UPSS)
➤नित्य प्रमुख दर्जा हा व्यक्तीने सर्वेक्षणपूर्व ३६५ दिवसांमध्ये तुलनेने अधिक काळासाठी केलेल्या आर्थिक कृतीशी संबंधित असतो.
➤जे व्यक्ती या संदर्भ ३६५ दिवसांमध्ये मोठ्या कालावधीसाठी (१८३ दिवस किंवा अधिक) एखाद्या आर्थिक कामात गुंतलेले प्रा असतात ते नित्य प्रमुख दर्जावर रोजगारात असल्याचे मानले जाते.
चालू साप्ताहिकदर्जा (Current Weekly Status: CWS)
➤ व्यक्तीच्या सर्वेक्षणपूर्व ७ दिवसांतीले आर्थिक कृतींचा समावेश होतो. या आधारावर सर्वेक्षणपूर्व ७ दिवसांत कोणत्याही एका दिवसात किमान एक तास काम करणाऱ्याला व्यक्तीस. रोजगारी समजले जाते.
चालू दैनिक दर्जा (Current Daily Status: CDS)
➤ यक्तीच्या सर्वेक्षणपूर्व ७ दिवसांतील दररोजच्या आर्थिक कृतींचा समावेश होतो. या आधारावर रोजगारी समजण्यासाठी त्याने संदर्भ आठवड्यात दररोज किमान ४ तासे काम करणे आवश्यक असते..
Others Blogs Related to MPSC Economics Notes In Marathi
Read All MPSC blogs
Download MPSC Books pdf
Connect With Us
Subscribe Us For Updates
Submit Your Email ID And Download Current Affairs 2023 Question Bank , Free! Free! Free!