https://www.dompsc.com


MPSC Maharashtra Geography(प्राकृतिक भुगोल)-MPSC Geography Notes

MPSC Maharashtra Geography(प्राकृतिक भुगोल)-MPSC Geography Notes
Author

By Shubham Vyawahare

10-July-2024

➤महाराष्ट्र राज्य हे अति प्राचीन राज्य असून १ मे १९६० पासून स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला आहे.

➤भारतात महाराष्ट्राचे स्थान एकदम मध्यवर्ती भागात आहेत.महाराष्ट्र राज्य हे उत्तर व दक्षिण राज्यांना जोडणारे दुवा असलेले राज्य आहे.

महाराष्ट्राचे स्थान व विस्तार

अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार : महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार 15° 44' उत्तर अक्षवृत्त ते 22° 6 उत्तर अक्षवृत्त रेखांश विस्तार 72° 36' पूर्व रेखावृत्त ते 80° 54' पूर्व रेखावृत्त आहे.

महाराष्ट्राच्या सीमा

➤पूर्वेस छत्तीसगड राज्याशी गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत.
➤ आग्नेयेस तेलंगणाला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या चार जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत.
➤ दक्षिणेस कर्नाटकला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच उस्मानाबाद, लातूर व नांदेड या सात जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत.
➤ दक्षिणेस गोवा राज्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याची सरहद्द आहे.

महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा

 • वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
 • उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
 • दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
 • पश्चिमेस : अरबी समुद्र.
 • ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
 • पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.

महाराष्ट्रातील सीमेवरील जिल्हे

 • वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
 • उत्तरेस : मध्यप्रदेश.
 • पूर्वेस : छत्तीसगड.
 • आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
 • दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ

लांबी, रुंदी व क्षेत्रफळ : पश्चिमेस अरबी समुद्रापासून पूर्वेस साधारणपणे पूर्व घाटापर्यंत महाराष्ट्र पसरलेला आहे. महाराष्ट्राची पश्चिम-पूर्व लांबी सुमारे 800 कि. मी. असून दक्षिणोत्तर रुंदी सुमारे 720 कि. मी. आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ. कि. मी. आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये राजस्थान (3,42,239 चौ. कि. मी.) व मध्य प्रदेश (3.08,346 चौ. कि. मी.) च्या खालोखाल महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्राने देशाचा 9.36% प्रदेश व्यापलेला आहे.

विभाग माहिती
जिल्हे 36
तालुके 355
कोकण विभाग 47 तालुके
पुणे विभाग 58 तालुके
नाशिक विभाग 54 तालुके
औरंगाबाद 76 तालुके
अमरावती विभाग 56 तालुके
नागपूर विभाग 64 तालुके
खेडी 43,663
जिल्हा परिषदा 34
ग्रामपंचायती 27,873
पंचायत समित्या 351
नगर परिषदा 226
महानगरपालिका 5
नगर पंचायत 13
कटक मंडळे 7

Download MPSC Maharashtra Prakrutik bhugol In PDF


Download MPSC Books pdf