https://www.dompsc.com



List of Fundamental Rights Article 11 to Article 35|MPSC Polity Notes

List of Fundamental Rights Article 11 to Article 35|MPSC Polity Notes

भारतीय राज्यघटनेतील Fundamental Rights(मुलभूत हक्क) आणि त्यांचे प्रयोजन

Author

By Shubham Vyawahare

15-April-2024

➤ राज्यघटनेच्या भाग ३ मध्ये कलम १२ ते कलम ३५ मध्ये मूलभूत हक्क दिले आहेत.
➤ मूलभूत हक्कांची तरतूद करताना आपल्या घटनाकारांनी अमेरिकेच्या राज्यघटनेपासून (मूलभूत हक्कांची सनद) प्रेरणा घेतली आहे

➤घटनेच्या या तिसऱ्या भागातील तिसऱ्या प्रकरणात न्यायालयाद्वारा लागू करता येतील अशा मूलभूत हक्कांची मोठी व सर्वंकष सूची दिली आहे.
➤सर्व व्यक्तींची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यापक सार्वजनिक हित आणि देशाची एकता ही तत्त्वे आपल्या राज्यघटनेने मान्य केली आहेत

कलम अपवाद
कलम ३३ सेनेच्या मुलभूत हक्काम्ध्ये फेरबदल करण्याचा अधिकार
कलम ३४ लष्करी कायदा अमलात असताना मुलभूत हक्कावर निर्बंध

भारतीय संविधानातील काही मुलभूत हक्क




कलम मुलभूत हक्क
कलम १२ राज्याची व्याख्या.
कलम १३ मूलभूत हक्कांशी विसंगत किंवा ते रद्द करणारे कायदे.
समानतेचा हक्क
१४ कायद्यासमोर समानता.
१५ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मठिकाण या कारणावरून भेदभाव करण्यास प्रतिबंध
१६ सार्वजनिक नोकऱ्यांबाबतीत समान संधी
१७ अस्पृश्यता निवारण.
१८ पदव्या रद्द करणे
स्वातंत्र्याचा हक्क
१९ भाषणस्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य आदी सहा स्वातंत्र्यांचे संरक्षण.
२० गुन्ह्याबद्दल दोषी ठरविण्यासंदर्भात संरक्षण.
२१ जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण.
२१ ए शिक्षणाचा हक्क.
२२ काही बाबतीत अटक व स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण
शोषणाविरुद्ध दाद मागण्याचा हक्क
२३ मानवी व्यापार व वेठबिगारी यांवर बंदी.
24 कारखान्यांमध्ये व इतर ठिकाणी बालकामगार नेमण्यास प्रतिबंध
धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
२५ धार्मिक आचार, विधी व प्रचाराचे स्वातंत्र्य.
२६ धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य.
२७ विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी कर न देण्याबद्दलचे स्वातंत्र्य.
२८ काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक पूजा आणि धार्मिक शिक्षण यांमध्ये सहभागी न होण्याचे स्वातंत्र्य
सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
29 अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण
30 शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व चालविण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क.
काही कायद्यांना संरक्षण
३१ अ मालमत्ता अधिग्रहण करणे इत्यादीबाबत तरतूद करणाऱ्या कायद्यांना सरक्षण
३१ ब काही कायदे व नियम यांना मान्यता देणे.
३१ क काही मार्गदर्शक तत्त्वे अमलात आणण्यासंबंधी कायद्यांना संरक्षण
३१ ड देशविरोधी कारवायांबाबत कायद्यांना संरक्षण. (रद्द केले)
घटनात्मक उपाययोजनाचा हक्क
३२ या भागातील अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना
३२ ए कलम ३२ मधील प्रक्रियेमध्ये राज्यांच्या कायद्यांची घटनात्मक वैधता विचारात घेतली जाणार नाही. (रद्द केले)
३३ या भागाने दिलेले हक्क सैन्यदल वगैरेंना लागू करताना त्यात बदल करण्याचे संसदेचे अधिकार.
३४ कोणत्याही क्षेत्रात लष्करी कायदा लागू असेल तर या भागाने दिलेल्या हक्कांवरील मर्यादा.
३५ या भागातील तरतुदी लागू करण्यासाठी कायदे करणे

Download List of Fundamental Rights Article 11 to Article 35|MPSC Polity Notes In PDF

➤ MPSC आणि सर्वच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी हा उपयुक्त भाग आहे यातून महत्वाची प्रश्न विचारल्या जातात,या पाठाचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी Download करून ठेवा.






Download MPSC Books pdf