https://www.dompsc.com



पंतप्रधानांचे अधिकार आणि कार्य|MPSC Polity Notes

पंतप्रधानांचे अधिकार आणि कार्य|MPSC Polity Notes

पंतप्रधान बद्दल माहिती

Author

By Shubham Vyawahare

19-April-2024

➤कलम ७४ अन्वये, राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल
➤ राष्ट्रपती आपली कार्ये पार पाडतांना त्या सल्ल्यानुसार वागेल.
➤भारताच्या घटनेने निर्माण केलेल्या संसदीय शासनव्यवस्थेत राष्ट्रपती हे नामधारी कार्यकारी आणि पंतप्रधान वास्तव कार्यकारी प्राधिकारी आहेत

पंतप्रधान ला कोण निवडून देते?

➤ कलम ७५ नुसार राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करतील.
➤ राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करू शकतात. संसदीय शासनपद्धतीमध्ये प्रस्थापित झालेल्या संकेतानुसार, राष्ट्रपतींना लोकसभेतील बहुमतातील पक्षाच्या नेत्यालाच (leader of majority party) पंतप्रधान म्हणून नियुक्त करावे लागते.



पंतप्रधान चे अधिकार आणि कार्य कोणते असतात?

पंतप्रधानाची संसदेतील कार्य

  • केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्री राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून नियुक्त केले जातात
  • पंतप्रधान मंत्र्यांमध्ये खातेवाटप करतात
  • पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सभांचे अध्यक्षस्थान भुषवितात आणि त्याच्या निर्णयांवर प्रभाव टाकतात.
  • पंतप्रधान सर्व मंत्र्यांच्या कृतीकार्यांचे मार्गदर्शन, दिशादर्शन, नियंत्रण व समन्वयन करतात, व अशा रितीने शासनाच्या धोरणांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी पंतप्रधानावर असते.
  • पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो.

पंतप्रधानांचे राष्ट्रपती आणि सरकार मधील दुवा म्हणून कार्य

  • पंतप्रधान हे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांमधील संपर्काचे प्रमुख माध्यम आहे
  • केंद्र शासन संबंधित सर्व कामे राष्ट्रपती च्या सल्याने करणे
  • भारताचे न्यायवादी,भारताचे महालेखाआदिक्षक ,लोकसेवा अध्यक्षांच्या नियुक्त्या करणे
  • नीती आयोग,राष्ट्रीय एकात्मता आयोग,राष्ट्रीय जलसंपदा परिषदा चे अध्यक्ष स्थान मिळवणे

पंतप्रधानांचे संसदेतील कार्य

  • संसदेची अधिवेशने बोलवणे
  • सरकारी धोरणांची घोषणा करणे

भारतीय पंतप्रधान व त्यांचा कार्यकाळ

नाव पकार्यकाळ
पंडीत जवाहरलाल नेहरू १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४
गुलझारीलाल नंदा (प्रभारी) २७ मे १९६४ ते ९ जून १९६४
लाल बहादूर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६
गुलझारीलाल नंदा (प्रभारी) ११ जानेवारी १९६६ ते २४ जानेवारी १९६६
इंदिरा गांधी २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७
मोरारजी देसाई २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९
चौधरी चरण सिंह २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८०
इंदिरा गांधी १४ जानेवारी १९८० ते ३१ ऑक्टोबर १९८४
राजीव गांधी ३१ ऑक्टोबर १९८४ ते १ डिसेंबर १९८९
व्हि.पी.सिंह २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९०
चंद्र शेखर ११ नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१
पी.व्ही.नरसिंहराव २१ जून १९९१ ते १६ मे १९९६
अटल बिहारी वाजपेयी १६ मे १९९६ ते ३१ मे १९९६
एच.डी.देवेगौडा १ जून १९९६ ते २० एप्रिल १९९७
आय.के.गुजराल २१ एप्रिल १९९७ ते १८ मार्च १९९८
अटल बिहारी वाजपेयी १९ मार्च १९९८ ते १३ ऑक्टोबर १९९८
अटल बिहारी वाजपेयी १३ ऑक्टोबर १९९९ ते २२ मे २००४
डॉ.मनमोहन सिंह २२ मे २००४ ते १७ मे २०१४
नरेंद्र मोदी २६ मे २०१४ पासून

पंतप्रधान संबंधित कलमे आणि प्रावधान

कलम प्रावधान
कलम ७४ राष्ट्रपती ला सहाय्य करण्यासाठी
कलम ७५ मंत्र्यासंबंधित
कलम ७८ पंतप्रधानची कामे
कलम ७९ राष्ट्रपती ला माहिती देणे

Download पंतप्रधानांचे अधिकार आणि कार्य|MPSC Polity Notes In PDF

➤ MPSC आणि सर्वच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी हा उपयुक्त भाग आहे यातून महत्वाची प्रश्न विचारल्या जातात,या पाठाचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी Download करून ठेवा.






Download MPSC Books pdf