https://www.dompsc.com

भारताच्या राज्यघटनेची प्रास्ताविक(Preamble) कसे होते?-MPSC Polity Notes

भारताच्या राज्यघटनेची प्रास्ताविक(Preamble) कसे होते?-MPSC Polity Notes

➤भारतीय राज्यघटना निर्मिती मध्ये राज्यघटनेच प्रस्ताविकेचे महत्व खूप प्रमाणात आहे,यातून MPSC Pre मध्ये हमखास प्रश्न येतात

➤MPSC Polity Preamble मधून सामन्यता ते कधी स्वीकारले ,ते घटनेचा भाग आहे का ,त्यात जे तत्वे सांगितली आहेत टी नेमकी कोणती आहेत असे प्रश्न येतात.

➤४२ व्या घटना दुरुस्ती कायदा, १९७६' नुसार ने यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता शब्द टाकण्यात आले.

➤ दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून घेतले.


प्रास्तविका म्हणजे काय?

➤प्रास्ताविका म्हणजे प्रस्तावना होय
➤प्रास्ताविकेत घटनेचा सार किंवा सारांश (essence) देण्यात येतो
➤नानी पालखीवाला यांनी प्रास्ताविकेला 'घटनेचे ओळख पत्र' (Identity Card of the Constitution) असे संबोधले आहे.
➤पंडित नेहृद्वारे मांडलेल्या उद्देश पत्राद्वारे हि तयार केली गेली होती.
➤उद्देश पत्र संविधान सभेत १३ डिसेंबर, १९४६ रोजी मांडले होते, तर संविधान सभेने ते २२ जानेवारी, १९४७ रोजी स्विकृत केले.

भारताच्या राज्यघटनेची प्रास्तविका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय,
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे
स्वातंत्र्य,
दर्जाची व संधीची समानता,
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची
प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन
देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून,
आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर,
१९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वत:प्रत अर्पण करीत आहोत

Download भारताच्या राज्यघटनेची प्रास्ताविक(Preamble) कसे होते?-MPSC Polity Notes In PDF

➤ भारताच्या राज्यघटनेमधील प्रास्तविका हा राज्य्घटनेचा महत्वपूर्ण भाग आहे ,हाच राज्यघटनेचा सार आहे


Download MPSC Books pdfConnect With Us


Subscribe Us For Updates


Submit To Get Current Affairs 2022 Question Bank for Free! Free! Free!